पिंपरी-चिंचवड

जलवाहिनीसाठी खोदाई, मात्र दुरुस्तीचा विसर

CD

चऱ्होली, ता. १९ : काही दिवसांपूर्वी जय गणेश साम्राज्य चौक ते वडमुखवाडी रस्त्यावरील गोदामाच्या बाजूची जलवाहिनी फुटली होती. तेथून पाण्याची गळती होत असल्याने महापालिकेने जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी रस्ता खोदला. परंतु रस्त्याची दुरुस्ती न केल्याने दुचाकी वाहनांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
जय गणेश साम्राज्य चौकामधून वडमुखवाडीकडे जाण्याचा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर वखार महामंडळासह इतर मोठ्या कंपन्यांची गोदामे तसेच इतर लहान-मोठे उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत. याच रस्त्यावरून श्री संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याला ऊस वाहतूक होत असते. तसेच वडमुखवाडी, चोविसावाडी, चऱ्होली, दिघी, आळंदी आदी परिसराकडे जाणाऱ्या वाहन चालकांची मोठी गर्दी असते. या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामध्येच काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी दुरुस्ती करण्यासाठी रस्ता खोदला होता. हे काम पूर्ण झाल्यावर रस्त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे होते. परंतु तेथे केवळ माती लोटून देण्यात आली आहे. त्यामुळे अवजड वाहने जाऊन तेथील रस्ता खचला असून मोठा खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे दुचाकी वाहने खड्ड्यांत आदळून वाहनांचे नुकसान होत आहे.

वाहतूक कोंडीचा प्रश्न
जय गणेश साम्राज्य चौक ते खडी मशीनकडे जाणारा रस्ता अरुंद असून अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर येत असल्याने या परिसरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यातच रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे ऊस वाहतूक ट्रॅक्टर, ट्रक, खडी वाहतूक व अवजड वाहतूक करणारी वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT