पिंपरी-चिंचवड

चिंचवड स्टेशन परिसरात माघी गणेश जयंती उत्साहात

CD

चिंचवड स्टेशन, ता. २२ ः श्री गणेश मंडळाच्या वतीने गणेश जयंती निमित्त सकाळी श्रींचा अभिषेक आणि होमहवन करण्यात आले. दुपारी आरती नंतर खिचडी आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गणेश जयंतीनिमित्त नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मोहननगर येथील सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी गणेश याग पूजा करण्यात आली. तसेच सायंकाळी भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

चिंचवड कडून केएसबी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर साईनाथ तरुण मंडळाच्या वतीने श्रींची मिरवणूक काढण्यात आली. तसेच संध्याकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

राजश्री शाहू मित्र मंडळाच्या वतीने शाहूनगर येथील अष्टविनायक गणेश मंदिरात गणेश जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सातही दिवस भजनी मंडळाकडून भजनाचा कार्यक्रम तसेच कीर्तन आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

पूर्णानगर येथील सिद्धिविनायक सेवा संस्थेच्या वतीने सार्वजनिक गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला. पहाटे पाच वाजता काकड आरती झाली. दिवसभर भजनी मंडळाच्या वतीने भजन, कीर्तन करण्यात आले. सायंकाळी आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.

संभाजीनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती आणि वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये पाच दिवसीय कीर्तन महोत्सव घेण्यात आला. गणेश जयंतीच्या दिवशी ‘आर्ट ऑफ लिविंग’ परिवार हा सत्संगाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. महाप्रसादाचे वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT