पिंपरी-चिंचवड

‘ईएसआय’ रुग्णालयात दहा वर्षांनंतर सोनोग्राफी सुविधा

CD

चिंचवड स्टेशन, ता. ६ : मोहननगर चिंचवड येथील राज्य कामगार विमा योजना (ईएसआय) रुग्णालयातील सोनोग्राफी सुविधा मागील दहा वर्षांपासून बंद आहे. पण, आठवडाभरात नवी यंत्रणा सुरू करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे कामगार आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

या ‘ईएसआय’ रुग्णालयात रोज ६०० ते ६५० रुग्ण आरोग्य तपासणीसाठी येतात. सोमवार आणि गुरुवारी ही संख्या सरासरी ८५० असते. या रुग्णालयात १०० खाटांची सुविधा आहे. गरजूं रुग्णांना सोनोग्राफीसाठी ‘ईएसआय’ने करार केलेल्या तपासणी केंद्रात जावे लागत आहे. त्यामुळे वेळ वाया जाण्यासह जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा सुपे यांनी अनेक दिवस पाठपुरावा करून ही सोनोग्राफी यंत्रणा आणण्यात यश मिळविले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भाडेतत्त्वावर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ तसेच त्वचारोग तज्ज्ञ नव्याने रुजू झाले आहेत. क्षयरोगासारख्या आजाराचे अचूक निदान करणारी ‘सीबी-नॅट’ ही यंत्रणादेखील रुग्णालयात बसविण्यात आली आहे. ही मशीन वापरण्याचे खास प्रशिक्षण घेतलेले तंत्रज्ञ लवकरच रुग्णसेवेत उपलब्ध होतील, असे डॉ. सुपे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: वैभव सूर्यवंशीच्या पावणे दोनशे धावा, कर्णधार आयुषचीही फिफ्टी! फायनलमध्ये भारताच्या ४०० धावा पार...

Income Tax Rule : ऑडिटमध्ये उशीर झाला तर थेट 75,000 रुपयांचा दंड! काय आहे नवीन नियम?

Latest Marathi News Live Update : भरधाव इन्होवा कार डिव्हायडरला धडकल्याने अपघात

Pargaon News : टाव्हरेवाडीच्या दोन भावांच्या गोठ्यातील संकरीत कालवडींचा राज्यात गवगवा; विविध कृषि प्रदर्शनात ठरत आहे अव्व्ल

Aircraft Technical Faults India : वर्षभरात किती विमानांमध्ये उद्भवला बिघाड? ; मंत्री मोहोळ यांनी लोकसभेत आकडाच सांगितला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT