पिंपरी-चिंचवड

मोहननगरला दिव्यांगाना संगणकाचे प्रशिक्षण

CD

चिंचवड स्टेशन, ता.१२ ः मोहननगर येथील अपंग रोजगार उद्योग व तांत्रिक प्रशिक्षण केंद्राच्यावतीने दृष्टिहीन आणि दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी आधुनिक प्रशिक्षण दिले जात आहे. केंद्रातून त्यांचा शारीरिक व मानसिक विकास केला जात आहे.
ग्रामीण भागातील दृष्टिहीन व दिव्यांगांना एकत्र करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कांतीलाल खिंवसरा चॅरिटेबल ट्रस्ट प्रणीत अपंग रोजगार उद्योग व तांत्रिक प्रशिक्षण केंद्राची एस. एम. चोरडिया यांनी १९९१ मध्ये स्थापना केली. आतापर्यंत या संस्थेतून ५०० हून अधिक दृष्टिहीन व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे, तर कोणी खासगी किंवा सरकारी नोकरी करत आहे.
खुर्च्यांचे विणकाम करणे, मेणबत्ती तयार करणे, खडू तयार करणे, परफ्यूम फिनेल तयार करणे अशा गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु या गोष्टी दिवसेंदिवस कालबाह्य होत चालल्या आहेत. त्यामुळे दृष्टिहिनांना अत्याधुनिक जगाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. आताच्या अत्याधुनिक जगात टिकून राहण्यासाठी त्यांना संगणक प्रशिक्षण दिले जाऊ लागले आहे. त्यामध्ये विविध अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहेत. याचबरोबर ॲक्युप्रेशरचेही प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे ते कोणत्या कंपनीत नोकरीही करू शकतात किंवा स्वतःचा व्यवसायही करू शकतात.

आताच्या काळात टिकून राहण्यासाठी आधुनिक प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. यामुळे आम्ही दृष्टिहीन व्यक्तींना संगणक आणि ॲक्युप्रेशर या दोन्हींचे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. खडू बनविणे, मेणबत्त्या बनविणे असे पारंपरिक प्रशिक्षण आजही सुरू आहे. त्यांना स्वबळावर उभे करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
- अक्षय चोरडिया, व्यवस्थापकीय अधीक्षक, अपंग रोजगार प्रशिक्षण केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : जिंतूरजवळ अकोली पुलावर भीषण अपघात; गंगाखेडचे चार तरुण जागीच ठार

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT