पिंपरी-चिंचवड

कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।

CD

पिंपरी, ता. १५ ः कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटीं झळाळी । कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १॥ अशी भावना मनी ठेवत असंख्य शिवभक्तांनी महाशिवरात्रीनिमित्त रविवारी प्रमुख शिवमंदिरांमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली. यानिमित्त विविध ठिकाणी महारुद्राभिषेक, होम हवन, धूप आरती, महाप्रसाद वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

धनेश्वर दर्शनाला रात्रीच रांग
चिंचवड स्टेशन ः चिंचवडगावातील पांडवकालीन धनेश्वर मंदिरात रात्री तीन वाजल्यापासूनच भाविकांनी मोठी रांग लावली. दिवसभरात शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. धनेश्वर विश्वास मंडळ ट्रस्टच्यावतीने मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाअभिषेक, नगारा वादन, आरती करण्यात आली. त्यानंतर डॉ. सोनाली मोपकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा स्वरपहाट कार्यक्रम झाला. विविध महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम झाले. सायंकाळी मोरया गोसावी धूप आरती करण्यात आली. रात्री आठ वाजता विजय कुलपे यांनी भावभक्ती गीतांचा भक्तिरंग कार्यक्रम सादर केला. रात्री अकरा वाजता धनेश्वर एकतारी, कालभैरव आणि हनुमान भजनी मंडळांकडून जागर कार्यक्रम घेण्यात आला. दिवसभर खिचडीचे वाटप करण्यात आले. मंदिर ४८ तास भाविकांसाठी खुले ठेवण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष कैलास साठे यांनी दिली.

मोहननगरला पार्वतीची ओटी
चिंचवड स्टेशन ः मोहननगर येथील वीरशैव लिंगायत गवळी समाज ट्रस्टच्यावतीने महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. पहाटे साडेचार वाजता अभिषेक, होम हवन करून मंदिर भाविकांसाठी दर्शनास खुले करण्यात आले. दिवसभर भाविकांसाठी खिचडी आणि केळीचे वाटप करण्यात आले. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री बारा वाजता आरती करून स्थानिक महिलांच्या हस्ते पार्वती मातेची ओटी भरून मंदिर बंद करण्यात येते. दुसऱ्या दिवशी १६ फेब्रुवारीला दुपारी बारानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष खंडू बहिरवाडे यांनी सांगितले.

शाहूनगरला जत्रेचे स्वरुप
शाहूनगर येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. शाहूनगर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. रस्त्यांवर खाऊ, खेळणी, घरगुती उपयोगी वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले. शिवशंभो फाउंडेशनच्या वतीने दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिवसभर भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनच्यावतीने उद्योजक आबा नागरगोजे आणि नरसिंग नरवटे यांना शिवशंभो कार्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोमवारी काल्याचे कीर्तन, भजन अभंग आणि भक्तिगीते असे कार्यक्रम पार पडून त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष संजय तोरखडे यांनी सांगितले.
एचडीएफसी कॉलनी येथील भोलेनाथ मंदिरात देखील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भोलेनाथ मित्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. संभाजीनगर येथील रामेश्वर मंदिरात पहाटे पाच वाजता होम करण्यात आला.

फळा-फुलांची आरास
पिंपरी ः सांगवी परिसरातील महादेव मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटेपासूनच पूजा, अभिषेक व दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. मंदिरात फळा-फुलांची आणि बेलाच्या पानांची मनमोहक आरास करण्यात आली. संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’च्या गजरात भक्तिमय झाल्याचे चित्र मंदिर परिसरात पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, शनी प्रदोष आणि महाशिवरात्र असा दुर्मिळ योग जुळून आल्याने भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून महादेव मंडळ, स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने चोख व्यवस्था करण्यात आली.

होमहवन, महाआरती
दापोडी येथील महादेव आळी, गावठाण भागात नवचैतन्यसह भोलेनाथ तरुण मंडळ आणि ढोल लेझीम संघ यांच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे ४ वाजल्यापासून श्री रुद्र, होमहवन पार पडणार असून दुपारी ३ ते ६ यावेळेत संगीत श्रीमद् भागवत कथा आणि रात्री ८ वाजता महाआरती झाली. या उत्सवानिमित्त गेल्या आठवडाभरापासून मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण, संगीत भागवत कथा, भजन सेवा आणि कीर्तनाचे कार्यक्रम झाले. काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.

‘हर हर महादेव’चा जयघोष
पिंपरी ः महादेव आळी येथील सांगवीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण मंदिराला रंगरंगोटी, महादेवाच्या पिंडीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पहाटे ३ वाजल्यापासून महादेवाच्या चरणी रुद्राभिषेक आणि महापूजेचे आयोजन करण्यात आले. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला उपवासाची खिचडी, प्रसादाचे वाटप केले गेले. सोमवारी परंपरेनुसार विधीवत होमहवन, काल्याचे कीर्तन, महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होईल.

रहाटणीतही मोठी गर्दी
काळेवाडी : रहाटणी गाव येथील पवना नदी काठावरील पुरातन शंकर मंदिरात अभिषेक, दुग्धस्नान, बिल्वपत्र अर्पण तसेच विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले. पहाटेपासून दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
श्री शंकर मंदिर ट्रस्ट व रहाटणी ग्रामस्थांच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. दिव्यांच्या रोषणाईमुळे मंदिर अधिकच खुलून दिसत होते. रहाटणी ग्रामस्थांच्यावतीने महारुद्राभिषेक, शिवलीलामृत पारायण, फराळ वाटप करण्यात आले. विविध महिला भजी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम झाले. तर सायंकाळी सामुदायिक महाआरती होऊन पालखी, दिंडी मिरवणूक काढण्यात आली. जय सीताराम भजनी मंडळ, भैरवनाथ भजनी मंडळ, जोगेश्वरी प्रासादिक दिंडी व ग्रामस्थांच्यावतीने सामुदायिक हरी जागर भजनाचा कार्यक्रम झाला. अध्यक्ष प्रवीण कोकणे आणि सहकाऱ्यांनी संयोजन केले.


भोसरी, इंद्रायणीनगरात उत्साह
भोसरी ः महाशिवरात्रीनिमित्त भोसरी, अंकुशनगर, इंद्रायणीनगरातील श्री महादेव मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली. विविध सामाजिक संस्थांद्वारे भाविकांना उपवासाची खिचडी, केळी, राजगिरा लाडू, उसाच्या रसाचे वाटप करण्यात आले.
भोसरी गावठाणातील श्री भोजेश्वर महादेव मंदिरात रविवारी पहाटे श्री महादेवाचा महाभिषेक करण्यात आला. सकाळी साडेसात वाजल्यापासून भाविकांना खिचडी, राजगिरा लाडू आणि केळीचे वाटप करण्यात आले. संध्याकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. रात्री बारा वाजता श्री भोजेश्वर महादेवाचा महारुद्राभिषेक करण्यात आला.

महापौरांकडून रुद्राभिषेक
अंकुशनगरातील मल्लिकार्जुन मंदिरात महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते पहाटे रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक अभिषेक झाले. सामाजिक कार्यकर्ते राहुल लांडगे, स्वप्निल लांडगे, बाळू लांडगे, किरण काटकर, मंगेश तोडकर यांच्या हस्ते सिद्धेश्वर मंदिर, स्वयंभू मल्लिकार्जुन मंदिर, चक्रपाणी वसाहतीतील शिवमंदिरात आलेल्या भाविकांना खिचडी आणि केळीचे वाटप करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता सिद्धेश्वर भजनी मंडळ यांचा हरिपाठ व रात्री संदीप महाराज सदगीर यांचे कीर्तन झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण लांडगे, विक्रम लांडगे, रवींद्र लांडगे, माऊली आदक, आनंदा चव्हाण आदींसह कै. अंकुश लांडगे प्रतिष्ठान, शिव गणेश मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

उस रसाचे वाटप
भोसरी गावठाणातील श्री भोजेश्वर महादेव मंदिराजवळ माजी नगरसेवक संतोष लोंढे आणि लोंढे तालीम मंडळाद्वारे भाविकांना खिचडी, राजगिरा लाडू, केळी आणि उसाच्या रसाचे वाटप करण्यात आले. या वेळी भाविकांना सहा टन उसाच्या रसाचे संध्याकाळपर्यंत वाटप करण्यात आले.
इंद्रायणीनगरातील इंद्रेश्वर देवस्थानच्या मंदिरात शिवरात्रीनिमित्त श्री महादेवाचा पहाटे रुद्राभिषेक आणि श्रींची महाआरती करण्यात आली. दुपारी एक ते चार भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी मृदगंध स्त्रोत पठण ग्रुपद्वारे कालभैरव पठण घेण्यात आले. रात्री अष्टक आणि शिवतांडव पठण झाले. रंग सप्तसुरांचे हा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. मंदिराद्वारे सोमवारी (ता. १६) सायंकाळी पाच वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन शिवशक्ती मित्र मंडळाने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चेस आता पूर्णविराम, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT