चिंचवड स्टेशन, ता. १३ ः शिवतेज नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात ११ ते २० मार्च दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दरम्यान दररोज सकाळी नऊ वाजता सामूहिक श्रीपाद श्रीवल्लभ पारायण सुरू आहे. २० मार्च रोजी सकाळी सात वाजता निर्मल विजय गुरुजी यांच्या हस्ते महाराजांचा अभिषेक व आरती करण्यात येणार आहे.
त्यानंतर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाहूनगर, पूर्णानगर आणि संभाजीनगर परिसरातील विविध भजनी मंडळांच्या वतीने भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी सात वाजता आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. तसेच रात्री आठ वाजता ‘स्वरमोहिनी’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नारायण बहिरवाडी यांनी दिली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.