पिंपरी-चिंचवड

गुरव समाज संस्थेतर्फे वधू-वर परिचय मेळावा

CD

चिंचवड, ता.१८ : गुरव समाज संस्थेच्या वतीने चैतन्य सभागृह चिंचवड येथे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला.
यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अमरावती, नाशिक आणि मुंबई-कोकण प्रांतातील सुमारे २०० उपवधू, उपवर तसेच त्यांचे पालक उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष गणपतराव मोकाते, कार्याध्यक्ष अण्णासाहेब गुरव, वधूवर मंडळाचे अध्यक्ष धैर्यशील दगडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक वैभव गुरव, सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई कोराटे, नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे, उद्योजक गणेश फुलारी आणि प्रा. माधुरी गुरव उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणांमधून विवाहसंस्थेचे बदलते स्वरूप आणि तरुण पिढीच्या अपेक्षांबाबत विचार मांडले. ‘अनुरूप जोडीदार हा फक्त समान व्यवसाय किंवा आर्थिक स्थितीवर नव्हे, तर परस्पर समजुतीवर ठरावा,’ असा सल्ला प्रा. गुरव यांनी दिला. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल प्रकाश गुरव, सुदाम गुरव, सदाशिव गुरव, रमेश गुरव, सीमा शिंदे, राजीव शेंडे, वैशाली भदे, गणेश फुलारी यांनी आयोजक तसेच उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT