चिंचवड, ता. २५ ः चिंचवड जकात नाका ते वाल्हेकरवाडी रस्त्यावरील पदपथांवर मोठ्या प्रमाणात राडारोडा, दगड, सिमेंटच्या पाइपचे तुकडे पडले असून, त्यातून अडथळे निर्माण होत आहे. परिणामी, पादचाऱ्यांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.
येथील रस्त्यावरील पदपथांवर जागोजागी अनेक दिवसांपूर्वी सुरक्षा भिंत बांधली होती. ती बांधताना त्याचा राडारोडा, सांडपाण्याची झाकणे, अर्धगोलाकार सिमेंटच्या पाइपचे भाग तेथे पडून आहेत. तसेच तेथील अडथळ्यांमुळे चालणे अडचण होत आहे. काही ठिकाणी पदपथावरच काँक्रिटचे मोठे तुकडे तसेच खडी पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात प्रशासनाने त्वरित कारवाई करून पदपथ स्वच्छ करण्याची मागणी होत आहे. येथून शाळा-महाविद्यालयाला दररोज हजारो विद्यार्थी, नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक ये-जा करतात. पदपथ अडथळेमुक्त नसल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे.
‘‘हा रस्ता रहदारीचा असून, तेथे अपघाताचा धोका वाढला आहे. महापालिकेने यावर तातडीने लक्ष देऊन राडारोडा उचलून साफसफाई करावी.
- गजानन भालेकर, स्थानिक रहिवासी
‘‘संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून नेमकी काय स्थिती आहे, ते पाहून त्यावर कार्यवाही केली जाईल.’’
- राजकुमार सूर्यवंशी, उपअभियंता स्थापत्य ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
‘‘ज्या ठिकाणी राडारोडा पडलेला आहे, तो कोणी टाकला, याची पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.’’
- सुधीर वाघमारे, सहाय्यक आरोग्य निरीक्षक, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.