चिंचवड, ता. ९ ः भोईरनगर येथील श्री विठ्ठल - रखुमाई मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला भोईरनगर, इंदिरानगर आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
मंदिराचे संस्थापक कै. सोपानराव (आप्पा) जयवंत भोईर यांच्या प्रेरणेतून आणि संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सव तसेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त हे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे पाच वाजता काकड आरती आणि श्रींच्या अभिषेकाने झाली. त्यानंतर सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा पार पडली. दुपारी १२. ३० वाजता वरदा भक्तिगीत महिला भजनी मंडळ, इंदिरानगर यांच्या विशेष भजनाचा भक्तिरसाने भरलेला कार्यक्रम झाला. त्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून महाप्रसादाचे वितरण सुरू करण्यात आले. संध्याकाळी सहा वाजता संतोषी माता महिला भजनी मंडळ, इंदिरानगर यांच्या भजन आणि हरिपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली. श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर भजनी मंडळाच्यावतीने करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.