पिंपरी-चिंचवड

मनपाच्या डिस्पेंसरीत नागरी सुविधांचा अभाव

CD

पालिकेच्या डिस्पेंसरीलाच ‘उपचारांची’ गरज
रुग्णांसाठी सुविधांचा अभाव : कर्मचाऱ्यांची अरेरावी, अस्वच्छताही वाढली

चिंचवड, ता. १४ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील साई अंब्रेला उद्यानात मनपाच्या वैद्यकीय विभागातर्फे दवाखाना (डिस्पेंसरी) सुरू आहे. तेथे योग्य रुग्णसेवा मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यावर जागृत नागरिक महासंघाने प्रत्यक्ष पाहणी करून येथील समस्या मांडल्या.
येथील कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी सौजन्याने वागावे, ज्येष्ठ नागरिक रुग्णांना विशेष सुविधा असल्याचा फलक लावावा, लहान मुलांसाठी वजन करण्याचे यंत्र तब्बल वर्षभरापासून नादुरुस्त, रुग्ण आणि महिलांसाठी स्वच्छतागृह वापरू देणे आवश्यक, येथील महिला स्वच्छतागृहाचे दरवाजे मोडकळीस आलेले आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नावाचा बोर्ड असावा, या मुद्द्यांवर हे मुद्दे महासंघाने दवाखाना भेटीनंतर मांडले आहेत. यावेळी महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव, शहर प्रमुख अशोक कोकणे, साहेबराव चौधरी, मच्छिंद्र कदम उपस्थित होते.

माझ्या मुलीला व तिच्या बाळाला येथे घेऊन आलो. डॉक्टरांना दाखवले. उन्हामुळे त्यांना घरी सोडून औषधे घेण्यासाठी आलो. मात्र, स्वतः बाळ व त्याची आई असल्याशिवाय औषध मिळणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना परत आणावे लागले.
- नंदकुमार जाधव, रुग्णाचे नातेवाईक

जागृत नागरिक महासंघाच्या वतीने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल फरांदे यांच्याशी चर्चा करून साई अंब्रेला दवाखान्यातील त्रुटी दाखवून दिल्या. कर्मचाऱ्यांचे वर्तन सौजन्याचे ठेवण्याबाबत सांगण्यात आले.
- नितीन यादव, अध्यक्ष, जागृत नागरिक महासंघ

या ठिकाणी कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी आहेत. लहान बाळांच्या वजन काट्यासंदर्भात मला माहिती मिळालेली नाही. पण, त्यांना लवकरच वजन काटा पोहचविला जाईल. शनिवारी डिस्पेन्सरीला भेट देऊन पाहणी करतो. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देतो
- डॉ. बाळासाहेब होडगर, वैद्यकीय अधिकारी, आकुर्डी रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Asha Bhosle: नातवाला शेवटचा व्हिडिओ कॉल… नातीच्या बोटात नशीबाची अंगठी घातली; आशा भोसलेंचा अखेरचा क्षण, मुलाने केला खुलासा!

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

SCROLL FOR NEXT