चिंचवड, ता. १८ : केएसबी चौक ते थरमॅक्स चौक मुख्य रस्त्यालगतच मोठा खड्डा पडला आहे. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दीड वर्षांपासून ही स्थिती आहे. तरीही, प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नाही.
येथील एचडीएफसी कॉलनी परिसरात बीएसएनएल ऑफिससमोर हा प्रकार समोर आला आहे. हा खड्डा इतका मोठा आहे, की मोठ्या वजनाचे वाहन यात अडकण्याची भीती आहे. या खड्ड्याखालून सांडपाण्याचा नाला गेला आहे. यामुळेच येथे रस्ता खचला असण्याची शक्यता बोलली जात आहे. महापालिकेने या ठिकाणी त्वरित बॅरिकेड्स लावून वाहनचालकांना इशारा द्यावा. रस्ता दुरुस्ती तातडीने सुरू करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
येथून जात असताना सायकलचे पुढील चाक या खड्ड्यात आपटले. त्यामुळे माझ्या सायकलचे नुकसान झाले. अन्य नागरिकांनाही असा अनुभव आला आहे. येथील रस्ता दुरुस्ती तातडीने व्हावी.
- अरुण कळंबे, स्थानिक रहिवासी, संभाजीनगर
दीड वर्षांपूर्वी हा खड्डा पडला आहे. त्याचा आकार वाढत आहे. कंपनीचे साहित्य घेऊन आमची गाडी आली, की मी या खड्ड्यावर ट्रक उभा करतो. त्यामुळे अन्य कोणते वाहन त्या वेळेत खड्ड्यात आपटत नाही.
- एक ट्रकचालक
सदर रस्ता खचून खड्डा पडलेल्या ठिकाणी आमचे संबंधित अधिकारी जाऊन पाहणी करतील. रस्ता दुरुस्तीसाठी नक्कीच उपाययोजना केली जाईल.
- विजय भोजने, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग, बीआरटीएस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.