पिंपरी-चिंचवड

वाल्हेकरवाडीत बगाड मिरवणूक उत्साहात

CD

चिंचवड, ता.१३ ः वाल्हेकरवाडीमध्ये गेल्या दीडशे वर्षांपासून चालत आलेल्या बगाड यात्रेचा सोहळा यंदाही पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. चैत्र पौर्णिमेनिमित्त हनुमान जन्मोत्सव आणि श्री काळभैरवनाथ महाराज यात्रेनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागातून यात्रा भव्य स्वरूपात पार पडली.
गावातील मारुती मंदिरात शनिवारी सकाळी ६ वाजता देवाचा अभिषेक, तसेच सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत पानफुलांचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर विविध भजनी मंडळांनी दिवसभर भजने सादर केली.
ढोल-ताशांच्या गजरात सायंकाळी पाच वाजता बगाड मिरवणुकीची सुरुवात झाली. गावकरी धनंजय तानाजीभाऊ वाल्हेकर यांना गळकरी; तर चांगदेव धोंडिबा वाल्हेकर यांना शेलकरी म्हणून मान देण्यात आला. मानकऱ्याला मारुती मंदिरात नेऊन परंपरेनुसार पाठीवर गळ टोचून आरती करण्यात आली. महिलांनी श्रद्धेने गळकरी व त्यांच्या पत्नीला ओवाळून आशीर्वाद दिले. त्यानंतर मानकऱ्याला बगाडावर दोरांच्या साहाय्याने लटकविले गेले. छत्रपती शिवाजी महाराज चौक (वाल्हेकरवाडी) ते वेताळनगरपर्यंत मिरवणूक झाली. श्री वेताळबाबा दर्शन घेऊन सर्व ग्रामस्थ चिंचवड येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात पोहोचले. तेथे आरती करून मिरवणुकीची सांगता झाली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात बगाडाचे रिंगण पार पडले. यावेळी ग्रामस्थांनी लहान मुले गळकरी आणि शेलकरी यांच्या कडेवर देऊन रिंगण फेरी मारून घेतली व मुलांच्या आरोग्यासाठी आशीर्वाद घेतला.
संध्याकाळी ८ वाजता संदीप वाल्हेकर यांच्या उत्कृष्ट व देखण्या दोन बैलजोडीच्या साहाय्याने बगाड श्री वेताळबाबा आणि हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन चिंचवडच्या श्री काळभैरवनाथ मंदिरात पोहोचले. गळकरी धनंजय वाल्हेकर यांच्या हस्ते सपत्निक आरती करून भंडारा खोबरे उधळण्यात आले. त्यानंतर बगाड यात्रेची सांगता झाली.
गळकरी धनंजय वाल्हेकर यांच्यावतीने ग्रामस्थांसाठी ११ एप्रिल रोजी सायंकाळी लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT