चिंचवड, ता.१५ ः पवनानगर परिसरातील जैन शाळेसमोरील चेंबर मोठ्या प्रमाणात तुटलेल्या अवस्थेत होते. चेंबरचे झाकण फुटून त्यामधील लोखंडी सळया उघड्या पडल्या होत्या. यामुळे पादचारी तसेच वाहनचालकांसाठी गंभीर अपघात होण्याची शक्यता होती. याठिकाणी शाळा कॉलेजचा परिसर असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यामुळे हे चेंबर दुरुस्त करण्याची गरज होती. त्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच महापालिकेचे उपअभियंता राजकुमार सूर्यवंशी यांनी तत्काळ दखल घेऊन चेंबरचे झाकण दुरुस्त केले. त्यामुळे संभाव्य होणारा अपघाताचा धोका टळला.
CWD25A00861
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.