चिंचवड, ता. १ ः प्रेमलोक पार्क येथील ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा उत्साहात पार पडली. त्यामध्ये वृद्धापकाळात उद्भवणाऱ्या मूत्रपिंड आणि प्रोस्टेट समस्यांवर डॉ. स्वाती माने यांनी आरोग्य मार्गदर्शन सत्र घेतले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष उत्तमराव चवरे होते. सचिव अशोक काटकर, दिलीप कांबळी, मीता चौगुले यांनी नियोजन केले. यावेळी कुंडमळा अपघातातील व्यक्तींना तसेच दिवंगत सभासद विलास वाडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपाध्यक्ष नाना जोगळेकर, हिंदुराव जाधव, लक्ष्मणराव शिंदे, रमेश रोडा, माधवी नवांगुळ, सल्लागार पळसनकर यांचे सहकार्य लाभले. दत्तात्रय सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.