पिंपरी-चिंचवड

डासांच्या उत्पत्तीस्थळांप्रकरणी चिंचवडमध्ये दंडात्मक कारवाई

CD

चिंचवड, ता. १५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई करत तब्बल १ लाख २७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला. डासांची उत्पत्ती, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि रस्त्यावर कचरा व राडारोडा टाकणे याविरोधात ही कारवाई करण्यात आली.
महापालिकेचे उपआयुक्त सचिन पवार, क्षेत्रीय अधिकारी किरणकुमार मोरे व सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आरोग्य निरीक्षक मुकेश जगताप, रूपाली साळवे, आरोग्य सहाय्यक सागर सणस आणि रोहन डामसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत एका आठवड्यामध्ये डासांचे उत्पत्ती स्थळ असलेल्या ठिकाणी १ लाख ११ हजार रुपये, प्रतिबंधित प्लास्टिक वापरल्यामुळे १० हजार आणि रस्त्यावर कचरा, राडारोडा टाकल्यामुळे ६ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय, दळवीनगर, पांढरकरनगर, इंदिरानगर येथील कचरा टाकण्याच्या ठिकाणी भित्तीचित्रांच्या माध्यमातून तसेच पेव्हिंग ब्लॉक बसवून परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT