पिंपरी-चिंचवड

एकत्रित पालख्यांचे उद्या चिंचवड गावात आगमन

CD

चिंचवड, ता. १८ ः ‘साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ या उक्तीनुसार चिंचवड गावातील भाविक जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज व श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांच्या एकत्रित पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
यंदाचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासात निर्धारित कार्यक्रमानुसार सोमवारी २१ जुलैऐवजी, एक दिवस आधी रविवारी (ता. २०) सकाळी सात वाजता चिंचवड गावात दाखल होणार आहे. या परंपरेचे हे आठवे वर्ष आहे.
चिंचवडच्या इतिहासात संत तुकाराम महाराज आणि मोरया गोसावी महाराजांच्या पालखीने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व मोरया गोसावी मंदिर येथे कीर्तनास दोन वेळा उपस्थिती नोंदविवल्याचा उल्लेख आढळतो. त्याच पावन स्मृतींना उजाळा देत देहू संस्थान पालखी दरवर्षी परतीच्या मार्गावर चिंचवड गावात थांबते.
यंदाच्या पालखीचे स्वागत काळभैरवनाथ उत्सव समिती, मोरया संस्थान व ग्रामस्थांतर्फे करण्यात येईल. यानिमित्त आरती, प्रसाद वाटप, विणेकरी व टाळकरी यांचा सन्मान अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे यंदाचा पालखी सोहळा प्रथमच चिंचवड स्टेशन मार्गे के. एस. बी. चौक, लांडेवाडी चौक (भोसरी), संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर, धाकट्या पादुका मंदिरमार्गे आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिराकडे जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजघराण्याशी संबंध, अनुभवी राजकारणी, भाजपचा प्रमुख चेहरा अन्...; महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मांचा राजकीय प्रवास काय?

महाराष्ट्रात महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! प्रसूती रजा वाढवली; अतिरिक्त अर्ध-पगारी सुट्टीही मिळणार, किती दिवसांची?

T20 World Cup : अहमदाबाद में जितना जरूरी था, आपको तो पता ही हैं! सूर्यकुमार यादव मुंबईत येताच काय म्हणाला बघा Video Viral

Mumbai Weather: कोकण-मुंबई पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट, वातावरण कसं राहणार? हवामान तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Umarga Accident : हॉटेलमध्ये कार घूसल्याने दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी, उमरगा शहराजवळ झाला अपघात

SCROLL FOR NEXT