पिंपरी-चिंचवड

गझलकार रघुनाथ पाटील यांना चिंचवडमध्ये काव्यात्मक आदरांजली

CD

चिंचवड, ता.१० ः महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पिंपरी चिंचवड, समिधा गझल मंच पुणे आणि साहित्य प्रकाश पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत गझलकार रघुनाथ पाटील यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त गझल अभिवाचन कार्यक्रमामध्ये त्यांच्या गझलांचे सादरीकरण करून काव्यात्मक आदरांजली वाहण्यात आली.
चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे वरील कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजन लाखे होते. डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले; तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे हे उपस्थित होते.
पाटील यांनी सर्वसामान्य माणसाचे सुख-दुःख, वेदना आपल्या गझलेतून प्रभावीपणे मांडल्या. कविता लेखनातही त्यांची समृद्ध परंपरा असून अनेक गझल स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. गझलेतील बारकावे तरुण पिढीला समजावून देण्यात त्यांचा हातखंडा होता, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात आत्माराम हारे,अनिल नाटेकर, प्रतिमा काळे, कविता काळे, नीलेश शेंबेकर, सुहास घुमरे, प्रदीप गांधलीकर, जयश्री श्रीखंडे यांच्यासह जवळपास २० गझलकारांनी पाटील यांच्या गझलांचे अभिवाचन केले. काव्य रसिकांसाठी हा कार्यक्रम स्मरणीय ठरला.
प्रशांत पाटोळे यांनी प्रास्ताविक केले. रेखा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले; तर किरण वेताळ यांनी आभार मानले. केले.
CWD25A01763

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : शासनाच्या तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील अटी शिथिल

Yavtmal School incident: धक्कादायक! तिसरीतील मुलीवर शाळेतील टॉयलेटमध्ये वर्गातील मुलाकडूनच अत्याचार

AUS vs SA, Video: बॉल स्टम्पला लागून लाईट्सही लागले, तरी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज नॉटआऊट; नेमकं काय घडलं की सर्वच झाले अवाक्

'Sanju Samson राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडण्याचं प्रमुख कारण रियान पराग', माजी क्रिकेटरनं सर्व गणित स्पष्ट सांगितलं

Meat Ban Controversy : स्वातंत्र्यदिनी मांसाहारावर बंदी घालणं अयोग्य...अजित पवार स्पष्टच बोलले... महापालिकांकडून निर्णय मागे घेतला जाणार?

SCROLL FOR NEXT