चिंचवड ः चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन, आकुर्डी तसेच आसपासच्या परिसरात मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस कोसळत राहिला. त्यामुळे नागरिकांना आवश्यक कामांसाठी देखील घराबाहेर पडणे कठीण झाले. अशातच उद्योगनगर ते चिंचवड रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यासह अनेक सोसायट्यांच्या आणि दुकानांसमोरील रस्त्यांवर पावसाळी चेंबर ब्लॉक झाल्याने सर्वत्र पाणी साचले.
दरवर्षी जोरदार पावसानंतर या ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. रस्त्याला उतार असल्यामुळे पाणी वाहून जाण्याऐवजी थांबून राहते. इथे नुकतेच पावसाळी चेंबर केले आहेत. परंतु ते अपुरे पडतात की काय ? अशी शंका येऊ लागली आहे. पादचाऱ्यांना चालताना मार्ग काढणे अवघड जाते; तर वाहनचालकांना वाहने चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जुने पदपथ तोडून नवीन करताना व रस्त्यावर हॉटमिक्स टाकताना नेहमी रस्त्याच्या उताराकडे साफ दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे क्वीन्स टाऊन परिसरात अगोदर थोडासा जरी पाऊस पडला की दुकानांसमोर रस्त्यावर पाणी साचते.
भोईरनगर चौक ते चिंचवड रेल्वे स्थानक हा दिवसभर रहदारीचा रस्ता असल्याने तेथे पाणी साचून सर्वांचीच नेहमी गैरसोय होत आहे.
- अनिल देवगावकर, रहिवासी, चिंचवड
या ठिकाणी नेहमी पाणी साचत होते. त्यामुळे पावसाळी चेंबर व वाहिनीचे काम करून नाल्याला जोडलेले आहे. परंतु तरीदेखील पाणी साचत असेल आणि त्यामध्ये काहीतरी अडकले असेल; तर ते संबंधित कर्मचाऱ्याला सांगून साफ केले जाईल.
- भाग्यश्री ढोले, कनिष्ठ अभियंता, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय
CWD25A01845
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.