चिंचवड, ता.३ ः वाल्हेकरवाडी, बिजलीनगर येथील गणेशोत्सव मंडळांनी ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि समाज प्रबोधनपर जिवंत देखावे सादर केले आहेत. तसेच मराठी भाषा आणि महाराष्ट्राची महती, विविध कार्यक्रम, विद्युत रोषणाईही केली आहे.
लग्नसोहळा खर्चाचा की विचारांचा ?
आहेरनगर येथील श्री चिंतामणी मित्र मंडळ यंदा २३ व्या वर्षात प्रवेश करत असून ‘लग्नसोहळा खर्चाचा की विचारांचा’ हा समाजप्रबोधनपर जिवंत देखावा सादर केला आहे. लेखन, दिग्दर्शन आणि सर्व कलाकार हे मंडळाचेच सभासद आहेत. नीलेश आहेर मंडळाचे अध्यक्ष आहेत.
शंभूराजे - एक विचार
चिंचवडेनगर येथील जय गुरुदत्त मित्र मंडळ १८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. मंडळाने यंदा ‘छत्रपती संभाजी महाराज-एक विचार’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. सचिन चिंचवडे मंडळाचे संस्थापक असून निखिल साठे अध्यक्ष आहेत. देखाव्यातून पुरातन व चालू पिढीतील फरक दाखवून सामाजिक जाणीवा जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्राची लोकधारा
वाल्हेकरवाडी येथील गुरुद्वारा चौकातील अखिल गुरुद्वारा एकवीरा व्यापारी संघटना मंडळाने ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे यंदाचे २७ वे वर्ष आहे. सुधीर वाल्हेकर हे अध्यक्ष आहेत.
म-महाराष्ट्राचा, म-मराठीचा
बिजलीनगर युवा प्रतिष्ठानने २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाने यंदा ‘म-महाराष्ट्राचा, म-मराठीचा, म-मंडळाचा, दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा’ हा देशभक्तिपर देखावा सादर केला आहे. राकेश सूर्यवंशी हे अध्यक्ष आहेत.
सामाजिक कार्यक्रम
दळवीनगर येथील समता तरुण मित्र मंडळ यंदा ४९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. आरोग्य व रक्तदान शिबिर, महिलांसाठी खेळ पैठणीचा, असे उपक्रम राबविले जातात. किरण दळवी मंडळाचे अध्यक्ष आहेत.
आरोग्य शिबिर, महाप्रसाद
भोईरनगर मित्र मंडळातर्फे दरवर्षी आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. विसर्जनाच्या दिवशी महाप्रसादाचेही आयोजन ही मंडळाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. मंडळ २० व्या वर्षात पदार्पण करत आहे. निखिल ठाकूर अध्यक्ष आहेत.
विद्युत रोषणाईतून जनजागृती
वाल्हेकरवाडीतील श्री गणेश मित्र मंडळ (तुकाराम नगरचा राजा) हे २२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अध्यक्ष तुषार जाधव, मार्गदर्शक धनंजय वाल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाईचा देखावा साकारला आहे. त्याद्वारे मराठा आरक्षण आंदोलनाबाबत जनजागृती घडविण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.