पिंपरी, ता.३० ः मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाने मोठे थैमान घातले असून अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. या परिस्थितीचे सामाजिक भान ठेवून दळवीनगर येथील समर्थ कॉलनी मित्र मंडळ ट्रस्ट तर्फे नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अन्नधान्य व शैक्षणिक साहित्य आणून देण्यात दिले.
मंडळाने गोळा केलेले सर्व साहित्य मराठवाडा युवा मंचाकडे सुपूर्द करण्यात आले असून हे साहित्य तातडीने पूरग्रस्त भागाकडे रवाना होणार आहे. या उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष गौरव कांबळे यांच्यासह प्रफुल्ल नायडू, युवराज पाटील, तुषार पाटील, अक्षय फणसे, राहुल नारखेडे, सागर जाधव, योगेश सुर्वे, धनंजय पाटील, अक्षय साळुंखे, ऐश्वर्या नायक तसेच मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.