चिंचवड, ता.६ ः आकुर्डी ते चिंचवडगाव रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. मात्र, रस्त्यावरील दुभाजकाच्या एका बाजूला ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय व त्याच्या दुसऱ्या बाजूला ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकार क्षेत्र येते. त्यातच अनेकदा खोदाई केली जात असल्याने रस्ता नक्की कोण दुरुस्त करणार ? याकडे सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.
भोईरनगर-दळवीनगर चौकातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून खड्ड्यांमुळे चौकात अपघात घडत आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार, महिला प्रवासी, शाळकरी मुलांच्या बस व रिक्षांना दररोज धोका पत्करुन प्रवास करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात कै.सोपानराव भोईर उड्डाणपुलासमोर पाण्याच्या वाहिन्यांमधून वारंवार पाण्याची गळती होत असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सहा ते सात वेळा खोदकाम करण्यात आले. तसेच महावितरणकडून देखील फिडरच्या दुरुस्तीसाठी खोदकाम केले गेले. मात्र, योग्य दुरुस्तीऐवजी केवळ मुरूम-माती टाकली जात असल्याने चौकाची अवस्था बिकट झाली आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडून ‘काम आज करू, उद्या करू’, अशी उत्तरे दिली जात असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
चिंचवडगाव ते आकुर्डी रस्त्यावर निव्वळ खड्ड्यांची मालिका दिसून येते. मात्र, दुभाजकाच्या एका बाजूने ‘अ’ आणि दुसऱ्या बाजूने ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांचे कार्यक्षेत्र असल्याने कोणीतरी खड्डे भरेल, या आशेने आम्ही वाट बघत आहोत. दुरुस्तीसाठी प्रत्येकाची टोलवाटोलवी चालू असते. परंतु वरिष्ठ लक्ष घालतील, ही जबाबदार नागरिक म्हणून अपेक्षा.
- अनिल देवगांवकर, रहिवासी, चिंचवड
भोईरनगर चौकातील खड्डे बुजवून रस्ता पूर्ववत करावा तसेच पाण्याच्या वाहिन्यांमधील पाणी गळतीमुळे वारंवार खोदकाम होत असते. त्यामुळे त्या वाहिन्या मुख्य रस्त्याच्या बाजूला हलवाव्यात.
- सुनील पाटील, रहिवासी, चिंचवड
CWD25A02185
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.