पिंपरी-चिंचवड

चिंचवड परिसरात पुन्हा कचऱ्याचे ढीग

CD

चिंचवड, ता.११ ः प्रेमलोक पार्क, इंदिरानगर व दळवीनगर परिसरात पुन्हा एकदा कचरा आणि पालापाचोळ्याचा ढीग साचला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलला न गेल्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. कचरा वेचक वाहन नियमितपणे येत नसल्याने नागरिक प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत.
महापालिकेतील आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहाय्यक आणि मुकादम या पदांवरील अधिकाऱ्यांकडे स्वच्छता, आरोग्य राखण्याची जबाबदारी असते. आरोग्य निरीक्षक स्वच्छतेचे रोज निरीक्षण व तक्रारींचे निराकरण करतात; आरोग्य सहाय्यक सफाई कर्मचारी व वाहनचालकांचे समन्वय पाहतात; तर मुकादम प्रत्यक्ष क्षेत्रात कामगारांचे पर्यवेक्षण करतात. परंतु, या तिघांचा समन्वय नसल्यामुळे कचरा नियमित उचलला जात नाही व त्यामुळे ठेकेदारही कामात ढिलाई करतात.
प्रेमलोक पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानासमोर तसेच नाल्यालगत कचऱ्याचे ढीग आठवडाभर तसेच पडून असून डेंगी व हिवताप यासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिक या परिस्थितीमुळे त्रस्त आहेत.
वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि महापालिकेकडे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्यांना रोजची जबाबदारी देऊन काम करून घेऊन परिसरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


CWD25A02239

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आज दिल्लीत होणार आगमन ; दौऱ्याकडे जगाचे असणार बारीक लक्ष!

आजचे राशिभविष्य - 04 डिसेंबर 2025

Swami Samarth Video: स्वामी समर्थ महाराजांचा गूढ प्रवास! भारत खंडातून फिरताना तयार होतो 'ॐ' आकार... प्रत्येक भक्ताने वाचावी अशी माहिती

Ruturaj Gaikwad: विराटने कशी मदत केली? चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना काय विचार केला, ऋतुराजने सर्वच सांगून टाकलं

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात पिज्जा पराठा ट्राय केलाय का? सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT