पिंपरी-चिंचवड

‘अतिटोकाच्या अहिंसेमुळे सनातन धर्माचे नुकसान’

CD

चिंचवड, ता.१२ ः ‘‘धर्म आणि राजकारण हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. राजकीय व्यवस्थेने नेहमीच धर्मांमध्ये दुही निर्माण केली आहे. भारतीय सनातन तत्वज्ञान हे सहिष्णू असले तरी अतिटोकाच्या अहिंसेच्या भूमिकेमुळे सनातन धर्माचे नुकसान झाले आहे.’’, असे मत विचारवंत डॉ. संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले.
गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्यावतीने, चिंचवडगावात आयोजित ७१ व्या मासिक व्याख्यानमालेत ‘धर्म, राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य’ या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमास किसन महाराज चौधरी, नाट्य परिषदेचे किरण येवलेकर, ज्येष्ठ साहित्यिक तानाजी एकोंडे, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे उत्तम दंडिमे, दत्ता सूर्यवंशी, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे माजी सदस्य गतिराम भोईर, व्याख्यानमाला समन्वय समितीचे राजेंद्र घावटे, रंगनाथ कुदळे आदी उपस्थित होते.
वैयक्तिक आयुष्यात धर्माचरण म्हणजे सुचिता पाळणे होय. जोपर्यंत योग्य धर्माचे पालन होत नाही; तोपर्यंत राजकारण सुधारत नाही आणि राजकारणी सुधारणार नाहीत. लोकशाहीत बहुसंख्येला महत्व असल्यामुळे धर्मवाढीसाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही डॉ. उपाध्ये यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT