पिंपरी-चिंचवड

अथर्व, चैतन्यकडून गोवा आयर्नमॅन पूर्ण

CD

चिंचवड, ता.१० ः जिद्द असेल; तर अशक्य काहीच नाही, हे दाखवून दिले आहे चिंचवडमधील अथर्व थोरात आणि चैतन्य बेणारे या दोघा मित्रांनी. गोव्यातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयर्नमॅन ७०.३ स्पर्धा परिश्रम, शिस्त तसेच चिकाटीच्या जोरावर त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.
या स्पर्धेत स्पर्धकांसमोर १.९ किलोमीटर जलतरण, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावणे हे सर्व टप्पे ८ तास ३० मिनिटांच्या मर्यादेत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या वर्षी ६८ देशांतील १२०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. दमट हवामान, समुद्रातील जलतरण आणि उन्हाचा तडाखा अशा आव्हानांवर मात करत अथर्व आणि चैतन्य या दोघांनी धैर्याने पूर्ण स्पर्धा पार केली. अथर्व याने १८ ते २४ वर्षे वयोगटात ७ तास ५६ मिनिटे ७ सेकंद तर चैतन्य याने ८ तास ११ मिनिटे १५ सेकंद इतकी वेळ नोंदविली.
अथर्वचे वडील भगवंत थोरात यांनी लहानपणापासूनच मुलाला निसर्ग, गिर्यारोहण आणि सायकलिंगची गोडी लावली; तर चैतन्यचे वडील तुकाराम बेणारे यांनी परिवारासोबत अगरबत्तीचा व्यवसाय सांभाळत मुलाच्या प्रत्येक उपक्रमाला साथ दिली. वडीलांच्या प्रेरणेने आणि कुटुंबाच्या पाठिंब्यानेच दोघांची ही वाटचाल साकारली. त्यांना चैतन्य वेल्हाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
CWD25A02473

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT