चिंचवड, ता. २६ : विविध शैक्षणिक कागदपत्रे स्पीड पोस्टद्वारे पाठविण्यासाठी विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा उमेदवारांना दहा टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय टपाल खात्याने घेतला आहे.
शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, विद्यापीठे, केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध भरती तसेच वेगवेगळ्या संस्थांना विद्यार्थी आपले कागदपत्रे पाठवितात. त्याच्या शुल्कात सवलतीचा लाभ देशातील सर्व टपाल कार्यालयात मिळणार आहे. यासाठी संबंधित विद्यार्थी-उमेदवारास मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल. तसेच लिफाफ्यावर ‘विद्यार्थी पत्रव्यवहार’ अशी नोंद करावी लागणार आहे. या नव्या उपक्रमामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचे पार्सल, पुस्तके, कागदपत्रे यांची देवाणघेवाण करण्यासाठी टपाल विभागाने ही सवलतीची योजना आणली आहे. विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा पत्रव्यवहार वेळेवर आणि कमी दरात पोहोचावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
- अभिजित बनसोडे, निदेशक, टपाल सेवा, पुणे विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.