पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांनी संशोधनातही उत्साहाने पुढे यायला हवे

CD

चिंचवड, ता. १३ ः ‘पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात मोठ्या उत्साहाने पुढे यायला हवे,’ असे आवाहन हडपसरमधील एस. एम. जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी केले.
चिंचवडमधील संभाजीनगर परिसरातील रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले महाविद्यालयात सात दिवसीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषद तसेच चर्चासत्राचे उद्‍घाटन त्यांनी केले. प्रारंभी दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतीश गोरडे, शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ. मच्छिंद्र गोफणे, सी-मेटचे प्रा. डॉ. रामचंद्र कलबर्मे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, प्रा. संजय अहिवळे, प्रा. शहाजी मोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा. दत्तात्रय हिंगणे यांनी प्रास्ताविक केले. परिषदेत विविध विषयांवर होणाऱ्या मार्गदर्शन सत्रांची माहिती त्यांनी दिली. ‘थिंक ग्रीन-कॅल्क्युलेट क्लीन’, ‘भाषा व साहित्य विकासात भाषांतराचे योगदान’, ‘भूगोल आणि शाश्वत पर्यटन’,‘ इमर्जिंग ट्रेण्डस् इन आंत्र्यप्रेन्यूअरशिप’, ‘भारताचे बदलते परराष्ट्र धोरण’, ‘एआय-मानसशास्त्र-ग्रंथशास्त्र व शारीरिक शिक्षण’, ‘बायो फ्युजन २०२५’ या विषयांवर चर्चासत्रे होतील.
याप्रसंगी आयआयटी मद्रासचे प्रा. डॉ. बीराह बैरे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी स्वागत केले. प्रा. रीमा बात्रा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा .प्रसाद बाठे यांनी आभार मानले. महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापकांनी संयोजनात सहकार्य केले.
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादांचा शेवटचा संवाद, कुणासोबत काय बोलले? विमान अपघाताआधीचा कॉल सर्वांना ऐकता येणार

Latest Marathi News Live Update : कोगील बुद्रुकचा कोतवाल लाच घेताना जाळ्यात; हजार रुपये घेताना कोल्हापुरात अटक

Accident : चार ऊसतोड कामगारांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; अज्ञात चालकावर गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana update : लाडक्या बहिणींना १५०० नाही २१०० देणार, योजना सुरू केलेल्या एकनाथ शिंदेंचे वक्तव्य

Candy Blast Incident : कँडी खाताच तोंडात स्फोट, तीन वर्षांच्या मुलीचा जबडा अन् गाल फाटला; धक्कादायक घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT