चिंचवड, ता. २ ः प्रेमलोक पार्क ते बिजलीनगर या रस्त्यावर महिला सहाय्यक कक्ष (गुन्हे शाखा) कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. विशेषतः रात्रीच्यावेळी पाण्याच्या टाकीकडे वळण घेताना किंवा कॉलनी रस्त्यावरून जाताना हे खड्डे स्पष्टपणे दिसत नसल्याने दुचाकी व चारचाकी चालकांना जोराचे धक्के बसत आहेत.
या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे. काही ठिकाणी खड्डे इतके खोल झाले आहेत की पाणी साचून त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अचानक ब्रेक लागणे, वाहन घसरून पडणे असे प्रकार घडू शकतात, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिक रहिवासी व वाहनचालकांनी या समस्येकडे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले असून तातडीने खड्डे बुजवून रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
वाहतूक सुरळीत राहावी, अपघात टळावेत आणि नागरिकांचा त्रास कमी व्हावा यासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.
CWD26A02718
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.