पिंपरी-चिंचवड

निसर्गसेवकांमुळे घोराडेश्वर डोंगर हिरवाईने नटला

CD

चिंचवड, ता.३ : मागील १५ वर्षांपासून घोराडेश्वर डोंगरावर आतापर्यंत सुमारे पंचवीस ते तीस हजार झाडे लावून ती यशस्वीरीत्या वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे ही झाडे उंच वाढून घनदाट झाली असून संपूर्ण डोंगर हिरवाईने नटलेला दिसत आहे. त्यामुळे या परिसरात पक्ष्यांबरोबरच वन्यप्राण्यांचा वावरही वाढला आहे.
निगडी येथील सावरकर मंडळाच्या निसर्ग विभागामार्फत घोराडेश्वर डोंगरावर सातत्याने वृक्षारोपण व संवर्धनाचे कार्य सुरू आहे. अभ्यासपूर्ण नियोजनातून नव्या रोपांभोवती आळी करणे, आठवड्यातून एकदा पाणी देणे, गवत काढणे आदी उपाययोजना करून तीन वर्षे विशेष काळजी घेतली जाते. हिरव्या वनराईमुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा वावरही वाढला आहे. तरस, ससे, मोर, हरीण, कोल्हे तसेच विविध प्रकारचे पक्षी येथे वारंवार दिसून येतात. परिणामी, शनिवार-रविवार तसेच सुट्ट्यांच्या दिवशी फिरायला येणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. मात्र, काही दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून वणवे लावण्याचे प्रकार घडत असून त्यातून लहान झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
विशेषतः ३१ डिसेंबरला डोंगरावर पार्टीसाठी येणाऱ्यांची गर्दी वाढत असल्याने वणव्याचा धोका अधिक असतो. ही बाब लक्षात घेऊन सावरकर मंडळाने वन विभागाच्या सहकार्याने ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत घोराडेश्वर डोंगर परिसरात कडक गस्तीचे नियोजन केले. चार-चार निसर्ग सेवकांचे गट तयार करून संपूर्ण डोंगरावर गस्त घालण्यात आली. या मोहिमेत वनविभागाचे चार कर्मचारी, सावरकर मंडळाचे निसर्गसेवक अध्यक्ष भास्कर रिकामे, शैलेश भिडे, विजय सातपुते, दीपक नलावडे, मनेश मस्के, धनंजय सावंत, संतोष पाटील, रितेश गुल्हाने, दयानंद भोसले, दत्ता माळी आदींनी सहभाग घेतला. तीन-तीन जणांचे गट करून संपूर्ण डोंगरावर लक्ष ठेवण्यात आले व वणव्यापासून झाडांचे यशस्वी संरक्षण करण्यात आले.
CWD26A02722

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: हरिश राणाच्या इच्छामरणासाठी १३ वर्षे का लागली? कायदा, कोर्ट आणि वेदनेची पूर्ण कहाणी; ही पहिलीच केस नाही तर…

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

SCROLL FOR NEXT