पिंपरी-चिंचवड

‘पिंपळमॅन’ कडून देशी वृक्षांच्या भवितव्याची जपणूक

CD

चिंचवड, ता. १० ः चिंचवडच्या प्रीमियर कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या सुभाष पाटील यांनी संत तुकाराम महाराज यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या अभंगवचनाचा अर्थ कृतीमधून उतरविला आहे. देशभर कामानिमित्त फिरताना ते वड-पिंपळाची रोपे संकलित करत असतात. त्यांनी यंदा दोन हजार वड-पिंपळ रोपे आणली असून त्यांचे संगोपन सुरू केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे ते परिसरात ते ‘पिंपळमॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
एखाद्या पदपथ तसेच कोणत्याही जागेवर उगवलेला एक अंकुर वाचवून त्याला वृक्ष बनवण्याची त्यांची ही चळवळ आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विकासाच्या वाटेवर वेगाने पुढे जाणाऱ्या शहरात निसर्गाची मुळे घट्ट रोवण्याचे काम सुभाष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिद्दीने सुरू ठेवले आहे.
सध्या विविध विकास कामे चालू असताना अनेक वृक्षांकुर अनवधानाने नष्ट होतात. पदपथ, कंपन्यांची पार्किंग स्थळे किंवा मोकळ्या जागांवर उगवलेले वड, पिंपळ, कडुलिंब, औदुंबर अशी रोपे अडथळा ठरून साफसफाईत काढून टाकली जातात. मात्र, या नष्ट होणाऱ्या अंकुरांना नवजीवन देण्याचे काम पाटील हे गेल्या चार वर्षांपासून करत आहेत.
महानगरपालिकेचे किंवा विविध कंपन्यांचे सफाई कर्मचारी जे रोपे काढून टाकतात. ती घरी आणून प्लास्टिक बॅगमध्ये लावणे, वर्षभर त्यांचे संगोपन करणे आणि पुन्हा वृक्षरोपणासाठी तयार करणे. हा त्यांचा दिनक्रमच झाला आहे. वृक्षदाई संस्थेच्या माध्यमातून देहूगाव व पंचक्रोशी परिसरात गेल्या सात वर्षांत जवळपास १५ हजार वृक्षांचे रोपण व संगोपन करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.


पत्नी, मुलांचे सहकार्य
या कार्यात त्यांची पत्नी प्रतिभा, चिरंजीव शंभूराजे व शिवनंदन यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभते. माती आणणे, पिशव्यांमध्ये भरणे यासाठी वृक्षमित्र विलास बोराडे, सचिन बकाले, अमोल गाडेकर यांच्यासह शेजारील छोटे वृक्षमित्र विराज सरवळे, आरोही पाटील, पार्थ बकाले, आर्यन पोखरकर, स्वराज वासकर, अर्णव बोराडे ही मुलेही हातभार लावतात.


निसर्ग सेवा हीच खरी ईश्वर सेवा या भावनेतून माझे वृक्ष संवर्धनाचे कार्य अखंडपणे चालू आहे. वडील बळवंत पाटील यांच्याकडून मिळालेला वृक्षप्रेमाचा वारसा मी जपला आहे. जन्मगावी कोल्हापूर येथे हजारो आंबा, सागवान, बांबूची लागवड करून त्यांचे यशस्वी संगोपन केले आहे. सध्या पक्ष्यांच्या विष्ठेतून फुटपाथ व भिंतींवर उगवणाऱ्या राष्ट्रीय वृक्ष वड-पिंपळांना जीवदान देण्याचे कार्य मी करीत आहे. आयुष्यभर वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प मी केलेला आहे.
- सुभाष पाटील, वृक्षप्रेमी


CWD26A02739, CWD26A02740

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पूजा खेडकरच्या घरी चोरी, ८ दिवसांपूर्वी घरकामाला आलेल्या नेपाळी कामगाराने सगळ्यांचे मोबाईल नेले चोरून

BMC Election: ना प्रचाराचा धुरळा, ना आरोपांच्या फैरी! काय चाललंय मुंबईतील मतदारांच्या मनात?

Indian Railway: ब्रिटिश पोशाखाला अलविदा! आता भारतीय रेल्वेमध्ये गणवेशात येणार आधुनिक टच, अश्विन वैष्णव यांची घोषणा

'तान्हाजी द अनसंग वॉरियर'चा येणार सिक्वेल ? अजयच्या त्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

Chandrashekhar Bawankule: काँग्रेसचा ‘लाडकी बहीण’ द्वेषाचा क्रूर चेहरा उघड: चंद्रशेखर बावनकुळे; पैसे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र!

SCROLL FOR NEXT