पिंपरी-चिंचवड

लिंक रोड परिसरातील वीजपुरवठा खंडित

CD

चिंचवड, ता.१० ः महावितरणच्या गावडे पेट्रोल पंपाजवळील रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) रात्री अचानक स्फोट झाल्याने लिंक रोड परिसरातील यशोमंगलम सोसायटीसह सुमारे २५० पेक्षा अधिक वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. रात्रीपासून वीज बंद असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
यशोमंगलम सोसायटीजवळील रोहित्र रात्री बंद पडल्याचे निदर्शनास आले. त्याला जोडलेले दोन ते तीन फिडरही बंद पडल्याचे आढळून आले. महावितरण कर्मचाऱ्यांनी रात्रीच तत्काळ दुरुस्ती करून फिडर सुरू केले. मात्र, त्यानंतर एका मांजराने रोहित्रावर उडी मारल्याने संपूर्ण रोहित्र पुन्हा बंद पडले आणि परिसरातील सर्व ठिकाणचा वीजपुरवठा विस्कळीत झाला.
सकाळी संपल्यानंतर महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जुन्या रोहित्राऐवजी नवीन पद्धतीने रोहित्र बसवण्याचे काम सुरू असल्याने वीजपुरवठा सुरू होण्यास काहीसा विलंब झाला. अखेर दुपारी साधारण दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास सर्व भागांतील वीजपुरवठा सुरळीतपणे पूर्ववत करण्यात आला.
अचानक व दीर्घकाळ खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे लिंक रोड, गावडे पेट्रोल पंप परिसर तसेच समोरील यशोमंगलम सोसायटीतील सर्व स्तरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. महावितरणने पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


गावडे पेट्रोल पंपासमोरील लिंक रोडवर काल रात्री जोराचा मोठा आवाज झाला. त्यामुळे इतर ठिकाणी रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला. काही प्रमाणात आमच्या व्यवसायावर देखील फरक पडला. वॉशिंग सेंटर देखील बंद राहिले. वॉशिंग न झाल्यामुळे ग्राहकांना वाहने परत देण्यास वेळ लागला.
- सुभाष चव्हाण, गॅरेज चालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT