पिंपरी-चिंचवड

कामगारांचा पाठिराखा काळाच्या पडद्याआड

CD

चिंचवड, ता.२८ ः कष्टकरी, कामगार, विविध भाषा-संस्कृती आणि समाजघटकांना सामावून घेणारे शहर म्हणून पिंपरी चिंचवडला ओळखले जाते. हजारो कुटुंबांनी रोजगाराच्या शोधात येत शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला. अशा या कामगारप्रधान शहराच्या विकासाशी आणि प्रश्नांशी घट्ट नाळ जपणारे नेतृत्व म्हणजे अजित पवार. त्यांच्या निधनाने पिंपरी चिंचवडने कष्टकऱ्यांचा खंबीर आधार आणि पाठिराखा गमावला, अशा शब्दांत विविध कामगार नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अजित पवार हे कामगारांच्या हक्कांसाठी ते सदैव उभे राहिले. २०१० मध्ये कंत्राटी कामगार निर्मूलन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत आम्हाला मोलाचे बळ दिले. आज ते आम्हाला पोरके करून गेले. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले असून ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.
- साजिद पठाण, सरचिटणीस, एसकेएफ एम्प्लॉईज युनियन

टाटा मोटर्समध्ये १९९९-२००० मध्ये पहिली ‘इंडिका’मोटार लॉन्च होत असताना कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि उद्योग टिकवण्यासाठी आम्ही टाटा मोटर्स कामगार संघटनेच्यावतीने त्यांच्याकडे करसवलतीची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून टाटा मोटर्सला विक्री करात सवलत दिली. त्यामुळे उद्योग टिकून राहिला आणि हजारो कामगारांच्या रोजगाराला संरक्षण मिळाले.
- सुजित पाटील, कामगार नेते


कामगार सुरक्षेबाबत अजित पवार हे जातीने लक्ष द्यायचे. घरेलू कामगार कल्याणकारी महामंडळासाठी तब्बल २५० कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली. फेरीवाला कायद्याबाबत त्यांनी तातडीने पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांशी संवाद साधून निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. कामगार, कष्टकरी आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली.
- काशिनाथ नखाते, असंघटित कामगारांचे नेते

अजित पवार हे फक्त राजकीय नेते नव्हते; ते आमच्या गोरगरिबांच्या, रस्त्यावर राबणाऱ्या ऑटो-टॅक्सी चालकांच्या, कामगारांच्या, वाहतूकदारांच्या खरे साथीदार होते. त्यांच्या मनात नेहमीच सर्वसामान्य माणसाची काळजी होती. आपुलकी, मानवता आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याची वृत्ती आपल्यातून कायमची हरपली. असंघटित कामगार-कष्टकरी जनतेने खरा आधार गमावला.
- डॉ. बाबा कांबळे, ऑटो-टॅक्सी कामगार संघटना

अजित पवार आणि एस.टी कामगार संघटना हे नात खूप घट्ट होतं. ते नेहमीच एसटी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कोरोनाकाळात कामगारांची चूल बंद पडू नये म्हणून वेतनासाठी एक हजार कोटी रुपये दिले. कामगारांच्या हिताचे निर्णय घेताना कधीही मागेपुढे पाहिले नाही.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

अजित पवार यांनी पीएमटी-पीसीएमटीचे विलीनीकरण करुन पीएमपीएमएलची स्थापना केली. पीएमपीएमएलची तूट भरुन काढण्यासाठी दोन्ही महापालिकांना अनुदान देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कामगारांना १९९७ मध्ये झालेल्या करारातील ३० टक्के रक्कम त्यांच्या प्रयत्नामुळे मिळाली. १५ वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएमपीएमएलमध्ये कायम करण्याचा निर्णय त्यांनीच घेतला. कामगार कल्याणाचे अनेक धाडसी निर्णय घेतले.
- सुनील नलावडे, सचिव, पीएमपीएमएल कामगार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT