पिंपरी-चिंचवड

रस्ता सुरक्षेबाबत चिंचवडला जनजागृती

CD

चिंचवड, ता. १ ः चिंचवड वाहतूक पोलिस तसेच टाटा ॲडव्हान्स सिस्टीम कंपनीच्या सहकार्याने चापेकर चौक येथे रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त नुकताच जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांचा यावेळी गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीता गायकवाड, महिला पोलिस हवालदार प्रज्वला बरवडे आणि त्यांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. त्यामध्ये वाहतूक पोलिस निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी चौकामध्ये नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. वाहन चालविताना सीट बेल्ट लावणे, दुचाकीवर हेल्मेटचा वापर, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास टाटा ॲडव्हान्स सिस्टीम कंपनीचे सुरक्षा अधिकारी मयूर जंगम यांच्यासह आनंद सावंत, जीवनराव रेडेकर, नवनाथ काळे, अमुलदास ख्रिस्तोफर, अमर गायकवाड, प्रदीप दगडे, शुभम शिंदे व कंपनीतील इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Sant Tukaram Maharaj Beej 2026: संत तुकाराम बीज का साजरी केली जाते अन् तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहित आहे का?

Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

Latest Marathi News Live Update : एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार

SCROLL FOR NEXT