पिंपरी-चिंचवड

हरवलेला मोबाईल दिव्यांगाला निवृत्त पोलिसामुळे मिळाला

CD

चिंचवड, ता. ३ ः पुणे-मुंबई महामार्गावर प्रवासादरम्यान चिंचवड स्टेशन परिसरात हरवलेला सुमारे ७० हजार रुपये किमतीचा मोबाईल निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या प्रामाणिकपणामुळे दिव्यांग व्यक्तीला परत मिळाला.
प्रामाणिकतेचा आदर्श जपलेल्या या व्यक्तीचे नाव सुभाष नेवे असे आहे. ते वाकडचे रहिवासी आहेत. ते साहाय्यक पोलिस आयुक्त होते. याबाबत माहिती अशी की, अतुल वसंत अवचिते हे बहिणीला भेटण्यासाठी नगरहून देहू रोडला निघाले होते. मोबाईल कुठेतरी पडल्याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यांचा मोबाईल नेवे यांना सापडला. नेवे यांनी शेवटच्या कॉलवर संपर्क साधून माहिती घेतली. त्यावेळी मोनालिसा साठे यांनी, ‘भाऊ अजून पोहोचले नाहीत,’ असे त्यांना सांगितले. मोबाइलमध्ये भावाच्या कामासंबंधी अत्यंत महत्त्वाचा डेटा असल्याचे सांगत त्यांना मोबाईल परत देण्याची विनंती केली. त्यावेळी नेवे यांनी त्यांना धीरच नव्हे तर खात्री दिली. त्यांनी अवचिते यांच्याशी संपर्क साधून त्यांना वाकड पोलिस ठाण्यात बोलावले. पोलिसांच्या उपस्थितीत मोबाईल अवचिते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याबद्दल अवचिते यांनी समाधान व्यक्त केले. वाकड पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनीही नेवे यांच्या प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली.
-----

Baramati Crime : बारामती तालुका पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटणा-या तिघांना काही तासात केले गजाआड....

Mathura Holika Dahan: जळत्या होळीमध्ये चालतो माणूस; मथुरेतील 'या परंपरेमागचं रहस्य काय? ४५ दिवसही करतो अन्नत्याग

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

SCROLL FOR NEXT