पिंपरी-चिंचवड

पोस्टमन काकांकडून आता जीवन विम्याचीही सेवा

CD

चिंचवड, ता.७ ः देशातील सर्वात जुनी आणि विश्वासार्ह जीवन विमा योजनांपैकी एक भारतीय टपाल विभागाची टपाल जीवन विमा योजना आता ‘पोस्टमन काका’ मार्फत आता थेट नागरिकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. पोस्टमन काका टपाल जीवन विम्याची माहिती देत पॉलिसी उपलब्ध करून देणार आहेत. नागरिकांना २० हजार रुपयांपासून ते ५० लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण घेणे शक्य होणार आहे.
पुणे शहर पूर्व टपाल विभागाने पिंपरी चिंचवड तसेच पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व टपाल कार्यालयांमधील पोस्टमन व टपाल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पात्र नागरिकांपर्यंत ही योजना पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे नागरिकांना टपाल विभागाच्या सर्वात जुना आणि विश्वासार्ह अशा टपाल जीवन विमा योजनेची माहिती देऊन अधिकाधिक नागरिकांना या योजनेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व पोस्टमन आणि पोस्टमास्तर यांना टपाल जीवन विम्याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून ते नागरिकांना मार्गदर्शन करून पॉलिसी घेण्यासाठी मदत करणार आहेत.

योजनेची वैशिष्ट्ये

- प्रति लाख रुपयांवर दरवर्षी सुमारे पाच हजार दोनशे रुपयांपर्यंत बोनस
- ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार परिपक्वतेची कालमर्यादा निश्चित करणे शक्य
- विम्याचा वार्षिक हप्ता भरल्यास दोन टक्के सूट, प्राप्तिकर कायद्यात करसवलत
- तीन वर्षांनी पॉलिसी गहाण ठेवून कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध
- ऑनलाइन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, बँक खात्यातून हप्ता वळता करण्याची सोय
- कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही


कोण आहेत पात्र ?
- विविध सरकारी विभागांतील कर्मचारी, अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांतील कर्मचारी
- व्यावसायिक शैक्षणिक पात्रता असलेले नागरिक
- नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील नोंदीकृत कंपन्यांतील कर्मचारी
- कोणत्याही शाखेचे पदवीधर नागरिक


केंद्र सरकारच्या सामाजिक संरक्षण व आर्थिक उन्नतीच्या धोरणाला अधिक बळ देण्यासाठी टपाल जीवन विमा योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांच्या आर्थिक उद्दिष्टपूर्तीसह कौटुंबिक सुरक्षिततेसाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे.
- समीर महाजन, प्रवर अधीक्षक, पुणे शहर पूर्व विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Website: मराठी डिजिटल बातम्यांमध्ये 'सकाळ डिजिटल' नंबर १; साडे सहा कोटींहून अधिक वाचकांचा विश्वास

Hapus Mango Price Rise : हवामानामुळे 'फळांचा राजा' महागला; उत्पादनात 30 टक्क्यांनी घट, भावात 25 टक्क्यांची वाढ

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

SCROLL FOR NEXT