पिंपरी-चिंचवड

ई-वेस्ट संकलन केंद्राला शाळा-महाविद्यालयांची भेट

CD

चिंचवड, ता.७ : वाढत्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या समस्येबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एन्व्हायरनमेंट कन्सर्वेशन असोसिएशन (ईसीए) तर्फे गवळीमाथा येथील ई-वेस्ट संकलन केंद्राच्या अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात आतापर्यंत १६ शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला आहे.
या उपक्रमात नेवाळे वस्ती पब्लिक स्कूल, म्हेत्रे वस्ती पब्लिक स्कूल, यशवंतनगर पीसीएमसी स्कूल, नेहरूनगर येथील राजीव गांधी स्कूल, पीसीएमसी विद्यालय रूपीनगर, टाटा विद्यानिकेतन स्कूल, पीसीसीओई महाविद्यालय आदी शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी केंद्राला भेट दिली. त्यांना ई-कचऱ्याचे संकलन, विलगीकरण व वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष दाखविण्यात आली. मोबाईल, संगणक, टीव्ही आदी उपकरणांतील धोकादायक घटकांमुळे माती, पाणी व हवा कशी प्रदूषित होऊ शकते, याची माहिती पीपीटीच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली.

आम्ही २०११ पासून ई कचऱ्याबाबत शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करत आहोत. शासनमान्य प्रक्रिया केंद्रात दिल्यास ई-कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते आणि त्यातील धातू व औद्योगिक घटकांचा पुनर्वापर होतो.
- विनिता दाते, अध्यक्षा, ईसीए

CWD26A02847

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ई-चालानची कडक कारवाई, पण दंड वसुलीचे काय? १ हजार ३४३ कोटी रुपयांच्या रक्कमेची थकबाकी

Property Tax: मालमत्‍ता कर थकवणाऱ्यांविरोधात महापालिकेचं मोठं पाऊल; नोटीस जारी, अंतिम मुदत काय?

DigiMHADA App : म्हाडा झालं डिजिटल! कुठेही जायची गरज नाही, 'या' सेवा मिळतील एकाच अ‍ॅपवर

Dhanashree Ahire : शेतकरी कुटुंबातील मुलगी झाली आयपीएस; धनश्री अहिरेची प्रेरणादायी यशोगाथा

Leopard: महाराष्ट्रातील बिबटे गुजरातला पाठवणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, पण प्राणीप्रेमींमध्ये वाद का उफाळला? वाचा प्रकरण...

SCROLL FOR NEXT