चिंचवड, ता.३० : चिंचवड ते बिजलीनगर या मुख्य रस्त्यावरील पवनानगर परिसरातील तुटलेल्या चेंबरची दुरुस्ती प्रशासनाने केली. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर राडारोडा आणि कचरा ‘जैसे थे’ स्थितीत आहे. त्यामुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पवनानगर येथील चेंबर तुटल्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत होत्या. नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित विभागाने चेंबरची दुरुस्ती केली. मात्र, दुरुस्तीसाठी खोदलेला सिमेंटचा राडारोडा,माती आणि जुन्या चेंबरचे अवशेष रस्त्याच्या कडेलाच बेवारसपणे सोडून दिले आहेत. मुख्य रस्ता असल्याने या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते.
रस्त्याच्या कडेला असलेल्या ढिगाऱ्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरण्याची शक्यता वाढली आहे. रात्रीच्यावेळी पथदिव्यांचा प्रकाश अपुरा असल्यास हा राडारोडा लक्षात येत नाही. त्याने मोठी दुर्घटना घडू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.