चिंचवड, ता. २१ ः महावितरणमधील सामाजिक बांधिलकी जपत तांत्रिक कामगार युनियन पिंपरी चिंचवड विभागाच्या वतीने बिजलीनगर, रावेत येथील सबस्टेशन परिसरात (ता.२०) वृक्षारोपण केले. कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे यांच्या हस्ते २१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
संघटनेमार्फत वर्षातून दोन वेळेस रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, दीपोत्सव, तांत्रिक कर्मचाऱ्यांचे अनाथाश्रमात वाढदिवस साजरे करणे तसेच गड-किल्ले मोहीम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते, अशी माहिती संघटनेचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष किशोर चोभे यांनी दिली.
कार्यक्रमास अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वास भोसले, कल्याण गिरी आदींसह सहाय्यक अभियंते व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे होते. केंद्रीय उपसरचिटणीस विलास निमसटकर तसेच संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी चंद्रशेखर बधे आदींनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अभिजीत वाघिरे यांनी केले.