पिंपरी-चिंचवड

चिंचवडमध्ये कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

CD

चिंचवड, ता. २४ ः दळवीनगर, इंदिरानगर, प्रेमलोक पार्क परिसरात गेल्या आठवडाभरापासून कचरा संकलन गाडी नियमित न आल्याने काही सोसायट्यांमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तसेच इतर कचऱ्याचे ढीग साचले असून पावसामुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
इंदिरानगर येथील शिवमंदिरासमोरील रस्त्यालगत गेल्या आठवड्यापासून झाडांच्या छाटलेल्या फांद्या तसेच पालापाचोळा पडून आहे. संबंधित विभागाकडून अजूनही हा कचरा उचलण्यात आला नाही त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात या कचऱ्यामुळे डास, कीटक व दुर्गंधी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, प्रेमलोक पार्क परिसरातील मधुबन सोसायटीमध्येही गेल्या तीन दिवसांपासून घरगुती कचरा उचलण्यात आलेला नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला. सोसायटी परिसरात कचरा साचल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन कचरा संकलन गाड्यांची नियमित व्यवस्था करावी, तसेच रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या व इतर कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

उद्यान विभाग तसेच महावितरणकडून अनेकदा झाडांच्या फांद्यांची छाटणी केल्यानंतर त्या जागेवरच टाकून दिल्या जातात. संबंधित विभागांकडून त्या तातडीने उचलल्या जात नसल्याने नागरिकांकडून आरोग्य विभागाकडे तक्रारी येतात. त्यानंतर आरोग्य विभागामार्फत या फांद्या व कचरा उचलण्याची कार्यवाही केली जाते. दळवीनगर, इंदिरानगर व प्रेमलोक पार्क परिसरातील साचलेला कचरा तसेच झाडांच्या फांद्या लवकर उचलण्यात येतील.
- भूषण शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मान्सूनच्या पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल

Mumbai News: बेस्टला पालिकेची मदत, ताफ्यात २७५ नव्या ई बस, १७० कोटी पुनर्विकासाचे मिळणार

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT