पिंपरी-चिंचवड

एशियन ड्रॅगन बोट स्पर्धेत भारताला दोन रौप्य पदक

CD

चिंचवड, ता.२४ ः जपानमधील क्योटांगो येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘एशियन ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
थेरगाव येथील पिंपरी-चिंचवड वॉटर स्पोर्ट्स सेंटरच्या खेळाडूंनी अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या डी-१०-२०० मीटर आणि डी-१०-५०० मीटर अशा दोन्ही प्रकारांत दोन रौप्य पदकांची पटकावले. या स्पर्धेत वॉटर स्पोर्ट्स सेंटरच्या १७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये अंकुश पोटे, देवेंद्र सुर्वे, सोमनाथ लगड, सौरभ ढोकळे, पूजा फडोल, वैष्णव शिंपी, मनीषा माळी, यशश्री खेडकर, सुदर्शन गावडे, प्रथमेश पाटील, विश्वजीत भोसले, प्रणव बारणे, जयेश माळी, निरंजन पाटील, माहेश्वरी पाटील आणि आकाश घाटगे यांनी उत्कृष्ट सांघिक कौशल्याचे प्रदर्शन केले.
भारतीय संघाचे प्रशिक्षक दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी हे यश संपादन केले. ​या कामगिरीबद्दल खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी क्रीडा स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, क्रीडा सभापती कैलास कुटे आणि क्रीडा समिती सदस्य तानाजी बारणे, बाळा बारणे आदी उपस्थित होते. क्लबचे अध्यक्ष सिद्धेश्वर बारणे, सचिव दत्तात्रेय बारणे प्रशिक्षक स्वामी महात्मे यांच्या पाठिंब्यामुळे खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT