पिंपरी-चिंचवड

समाजातील निराधार, बेवारसांसाठी ‘माणुसकीचा दीप’

CD

चिंचवड, ता.९ : वाल्हेकरवाडी येथील गुरुद्वारा परिसरातील मोनीबाबा वृद्धाश्रमात माणुसकीचा दीप उजळवला जात आहे. समाजातील निराधार, बेवारस, वृद्ध आणि गरजू व्यक्तींना सन्मानाने अन्न मिळावे, या उदात्त हेतूने आश्रमाच्या वतीने गेल्या २२ वर्षांपासून अखंड लंगर सेवा सुरू आहे. विशेष म्हणजे ही सेवा केवळ सणासुदीपुरती मर्यादित नसून वर्षातील ३६५ दिवस अविरतपणे सुरू आहे.
या सेवाकार्यात आश्रमाचे अध्यक्ष अशोक खोसला, जगमोहन धिंग्रा, गौतम भगत, पवन सिंह आणि कमलजीत सिंह यांच्यासह आश्रमाची संपूर्ण सेवेकरी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. अन्नदानाच्या माध्यमातून गरजूंची भूक भागवतानाच त्यांना प्रेम, आपुलकी आणि कुटुंबाचा आधार देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
विशेष म्हणजे आश्रमातील ज्येष्ठ नागरिकही या सेवाकार्यात सक्रीय सहभाग घेतात. सर्वांच्या एकजुटीने सुरू असलेल्या या उपक्रमातून सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडत आहे. दिवाळीचा खरा आनंद केवळ घराची सजावट आणि रोषणाई करण्यात नसून गरजूंच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे, याची प्रचिती मोनीबाबा वृद्धाश्रमाच्या या उपक्रमातून येते.


गेल्या २२ वर्षांपासून आश्रमाच्या माध्यमातून अखंड लंगर सेवा सुरू आहे. निराधार आणि गरजू व्यक्तींना अन्न देऊन त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणे, हाच आमचा सेवाभाव आहे. दिवाळीचा खरा आनंद गरजूंच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यात आहे. सर्व सेवेकरी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने ही मानवसेवा यापुढेही अखंड सुरू राहील.”
- अशोक खोसला, अध्यक्ष, मोनीबाबा वृद्धाश्रम, गुरुद्वारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतातील एका वर्षाच्या आठवणींनी परदेशी पर्यटक भावुक; 'या देशाने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला'

India Women Squad : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या वनडे, टी२० अन् कसोटी संघांची घोषणा! स्मृती मानधना असणार कर्णधार

Maharashtra Live News: मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; मेढ्यात भाजप कार्यकर्ते व नागरिकांचा भव्य मोर्चा, कठोर कारवाईचा इशारा

Kolhapur Talent: एका इन्स्टा व्हिडीओने उघडले नशिबाचे दार; कोल्हापुरातून थेट अमेरिकेच्या बॉय बँडमध्ये एन्ट्री! जाणून घ्या दर्शन मगदूमचा भन्नाट प्रवास

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

SCROLL FOR NEXT