पिंपरी-चिंचवड

‘जन्मोत्सव महापुरुषांचा संकल्प पर्यावरण संवर्धनाचा’

CD

देहू, ता. १५ ः वृक्षदाई संस्थेच्या वतीने छत्रपती शंभूराजे यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘जन्मोत्सव महापुरुषांचा संकल्प पर्यावरण संवर्धनाचा’ या संकल्पनेतून महापुरुषांच्या जयंतीनिमित्त देशी वृक्ष लावण्यात आले. छत्रपती शंभुराजे यांच्या ३६७ व्या जयंतीनिमित्त देहूतील जलशुद्धीकरण केंद्र येथे वड, पिंपळ, कडुनिंब, औदुंबर, अर्जुन, ताम्हण, बहावा अशा ३२ देशी वृक्षांचे रोपण व्याख्याते तथा प्रवचनकार गणेश महाराज शिंदे, बांधकाम व्यावसायिक गोपालक शिवाजी शिऊडकर यांच्या हस्ते झाले.
देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, अध्यक्ष शिवाजी मोरे, देहू नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक रामराव खरात, संग्राम पाटील, अमोल गाडेकर, सुभाष पाटील, महेश चौधरी, केदार शिंदे, राकेश वाघमारे, सुनील निंभोरकर, विकास बोराडे, सुनील सरवळे, हंसराज लांजेवार, मंगेश घुरुडे, अमित चौधरी, मच्छिंद्र गवळी आदी उपस्थित होते.
शिंदे महाराज म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शहाजी महाराज व शंभूराजे यांचे पर्यावरणाशी अतूट नाते होते. याबाबतचे दाखले देत आपण ही या संस्थेचा एक भाग बनू आणि पर्यावरणासाठी चांगल्या पद्धतीने योगदान देऊ.’’ सचिव संतोष हगवणे, पूजा दिवटे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुभाष पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्रात धक्कादायक घटना; भाजप मंत्र्यांच्या भावाला अन् पुतण्याला मारहाण, Video समोर आल्यानंतर खळबळ

Viral Video: 'बॉम्बे पंजाबच्या खूप मागे... ' शिवम दुबेचा पतंग कापत अभिषेक शर्माने उडवली खिल्ली

Latest Marathi News Live Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, शेकडो किलो पनीर जप्त

Pune FDA Action : पुण्यात चार ट्रक संशयित खवा, पनीर जप्त; एफडीएची गणेशोत्सवापूर्वी मोठी कारवाई!

Kolhapur Infrastructure: टोपचा उड्डाणपूल अडकला ठेकेदारांच्या वादात; सहापदरी कामाकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष; नव्या निविदेमुळे काम आणखी लांबणार

SCROLL FOR NEXT