पिंपरी-चिंचवड

देहूत शुक्रवारी निघणार प्लास्टिक अंत्ययात्रा

CD

देहू, ता. २१ : देहू नगरपंचायतीच्या हद्दीत प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी येत्या २४ मे रोजी प्लास्टिक अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
देहू नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी निवेदिता घारगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यालयीन अधिक्षक रामराव खरात, आरोग्य निरीक्षक संदीप कुराडे, शहर समन्वयक अक्षय रोकडे, देहू नगरपंचायतचे स्वच्छता दूत शिवाजी महाराज मोरे, शिल्पा मापूसकर, व्यापारी संघटनेचे राजेश अग्रवाल, विशाल माळी, निरंजन साकोरे, प्रकाश पाटील, महिला बचत गटाचे रेखा चव्हाण व नंदा घनवट, विविध कार्यकारी सोसायटीचे प्रीतम वारघडे आदी उपस्थित होते. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्लास्टिक वापरावर आळा घालण्याकरिता देहू नगरपंचायतमार्फत फिरते पथक तयार करण्यात आले असून, पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी देहू नगरपंचायत कार्यालय येथून देहू गाव परिसरात प्लास्टिकची अंत्ययात्रा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती निवेदिता घारगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT