पिंपरी-चिंचवड

तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे बुधवारी प्रस्थान

CD

देहू, ता.१६ ः आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या बुधवारी (ता.१८) दुपारी अडीच वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली.
पालखी सोहळ्याचे प्रमुख दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे म्हणाले, ‘‘यंदाचा ३४० वा पालखी सोहळा आहे. त्याचा प्रस्थान कार्यक्रम बुधवारी दुपारी अडीच वाजता मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून सुरू होईल. संस्थानच्यावतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून त्याला उजाळा देण्यात आला आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्या देहूत दाखल झालेल्या आहेत. ५०० दिंड्या आहेत. यंदा संस्थानने तीन बैलजोडी स्वतः खरेदी केल्या आहेत. देऊळ वाड्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.’’

देहूतील पूर्वतयारी, सोयी-सुविधा...
- मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी
- संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायतीकडून पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी
- राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी, भाविक देहूत दाखल
- त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरीतील ग्रामस्थ सज्ज, इंद्रायणी नदीचा काठ वारकऱ्यांनी फुलला
- भाविकांच्या स्वागतासाठी पालखी मार्गावर जागोजागी कमानींची उभारणी
- देहूतील विविध संस्था आणि ग्रामस्थांच्यावतीने अन्नदानासाठी मंडपांची उभारणी
- नगरपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यंत्रणा सज्ज
- आरोग्य विभागाकडून चार ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग सुरू, गावातील पाण्याच्या नमुनांची तपासणी
- एकूण दहा रुग्णवाहिका वारकरी, भाविकांच्या सेवेत राहणार
- नगरपंचायत, आरोग्य विभागाकडून ५०० दिंड्यांना आरोग्य कीटचे वाटप होणार
- सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देहू ते देहूरोड पालखी मार्गाची दुरुस्ती पूर्ण
- इंद्रायणी नदीच्या घाटावर जीवरक्षकांची तैनाती
- गाव परिसरात सुमारे १२०० फिरती स्वच्छतागृहांची व्यवस्था

आजपासून अवजड वाहतूक बंद
भाविकांच्या सुरक्षेसाठी ४०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे देहूला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. उद्या मंगळवारी (ता. १७) ते गुरुवार (ता. १९) पर्यंत देहूतील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तसेच गुरूवारी पुणे - मुंबई महामार्गावरील निगडी ते देहूरोड दरम्यान वाहतूक कात्रज बाह्यवळण महामार्गाने वळविण्यात आलेली आहे. गावाबाहेर वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे.


पालखी प्रस्थान सोहळा कार्यक्रम
- बुधवारी (ता.१८) पालखी प्रस्थान कार्यक्रमास सुरुवात होणार
- पहाटे साडेचार वाजता देऊळवाड्यात काकडा
- पहाटे पाच वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संस्थानच्यावतीने महापूजा
- पहाटे साडेपाच वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा
- सकाळी सहा वाजता वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा
- सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्यावतीने महापूजा
- सकाळी ८ ते ९ यावेळेत गाथा भजनाची सांगता
- सकाळी दहा ते बारा या वेळेत देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन
- दुपारी बारा ते दोन या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम
- इनामदारवाड्यातून संत तुकाराम महाराज पादुकांचे दुपारी दोन वाजता मुख्य देऊळवाड्यात आगमन

- पालखी प्रस्थान सोहळ्यास दुपारी अडीच वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमास सुरुवात
- पालखीची सायंकाळी पाच वाजता मंदिर प्रदक्षिणा
- सायंकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळा इनामदार वाड्यात मुक्कामी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT