देहू, ता. १६ ः मावळ खोऱ्यात पडत असलेल्या संततधार पावसाने देहूतील इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. देहूतील इंद्रायणी नदीच्या काठावर असलेल्या पित्ती धर्मशाळा आणि संत गाडगेबाबा धर्मशाळेच्या पायऱ्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त इंद्रायणी नदीच्या घाटावर उभारलेल्या मंडपातही नदीचे पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायत, गावकामगार तलाठी कार्यालय आणि देहूरोड पोलिसांच्यावतीने खबरदारी म्हणून घाटावर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
येत्या १८ जूनला आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी देहूत भाविक दाखल होत आहेत. मात्र गेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने गावातील रस्ते, नाले जलमय झालेले आहेत. तसेच इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झालेली आहे.
याबाबत देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी सांगितले, ‘‘इंद्रायणी नदीकाठावरील मुकुंदलालजी पित्ती धर्मशाळेच्या पायऱ्यांपर्यंत पाणी आले आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी काळजी घ्यावी. तसेच घाटावरील मंडपात नदीचे पाणी शिरले आहे. यातील वारकऱ्यांनी दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे.’’ गावकामगार तलाठी एन. लोखंडे यांनी संत गाडगेबाबा धर्मशाळेतील व्यवस्थापकांना सूचना दिल्या आहेत.
कुंडमळा येथील दुर्घटनेतील एक मृतदेह इंद्रायणी नदीत वाहत किन्हई मार्गे देहूत आल्याची माहिती देहूचे पोलिस पाटील चंद्रसेन टिळेकर यांना आज सकाळी मिळाली. त्यामुळे रायगड येथील बचाव पथकाच्या सोबत बोटीतून किन्हई ते देहू नदीतून मृतदेहाचा शोध घेतला. मात्र, सायंकाळी चार वाजेपर्यत मृतदेह सापडला नाही, असे टिळेकर यांनी सांगितले.
देहू ः आषाढी वारीनिमित्त आलेल्या वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीच्या घाटावर मंडप उभारला. मात्र, नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मंडप पाण्यासाठी गेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.