पिंपरी-चिंचवड

संस्कारांच्या सामर्थ्यातून जीवनाला प्रेरणा

CD

देहू, ता. १ : ‘‘संस्कार जीवनाला आकार देतात. मनाला सदविचारांच्या वाटेने प्रवास करण्यासाठी अखंड प्रेरित करून जीवनाला सामर्थ्य प्रदान करतात. जीवनाच्या संघर्षातही स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा देतात. सृजनदीप व्याख्यानमाला ही नावाप्रमानेच विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनातून मांगल्याचा, चैतन्याचा सृजन अविष्कार घडवित आहे,’’ असे प्रतिपादन लेखक, विचारवंत, माजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.

देहू येथील अभंग इंग्रजी शाळेत सृजन फाउंडेशनतर्फे ‘सृजनदीप व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली. यात ‘संस्कारांचे सामर्थ्य’ या विषयावर डॉ. पाटणे यांनी पहिले पुष्प गुंफले.
दुसरे पुष्प संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी गुंफले. त्यांनी ‘यशाची गुरुकिल्ली’ या विषयातून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. तर, तिसऱ्या पुष्पात स्नेहवन संस्थेचे संस्थापक अशोक देशमाने यांची इयत्ता सातवीतील चार विद्यार्थिनींनी मुलाखत घेतली.
आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या पाल्यांचे मोफत संगोपन करत त्यांना शिक्षण देणाऱ्या आळंदीजवळील कोयाळी फाटा येथील असणाऱ्या स्नेहवन संस्थेचे संस्थापक अशोक व अर्चना देशमाने यांना या वर्षीचा ‘सृजनसेवा पुरस्कार’ आणि सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. तसेच शाळेने राबवलेल्या ‘दिवाळी मेळा’ या उपक्रमातून झालेल्या नफ्यातील रुपये ५१ हजार रुपयांचा धनादेश ‘स्नेहवन’ संस्थेला या निमित्त देण्यात आला. सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद व सचिव प्रा. विकास कंद यांनी नियोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : होळीच्या नावाखाली क्रूरता ! बैलगाडी ओढणाऱ्या गायीला हुल्लडबाजांनी पाजली दारू, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

Latest Marathi News Live Update : एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात 11 जण अटकेत, मुख्य आरोपी आलोक चौधरी फरार

'होळी ही वॉर्निंग आहे' प्रिया बापट आणि पंचायत फेम 'सचिव जी' यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरने वाढवली उत्सुकता

Iran-Israel War : इराण-इस्रायल युद्धामुळे बळीराजा अडचणीत; नाशिकचा शेतीमाल विमानतळावरच अडकला

SCROLL FOR NEXT