पिंपरी-चिंचवड

देहू आर्मी पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम

CD

देहू, ता. ७ : अशोकनगर येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून ‘अन्ताया-स्वरभारती : सेलिब्रेटिंग द साऊंड ऑफ इंडिया’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘स्व’- उद्योजकता शिखर संमेलन असा हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रिगेडियर आशिष कटोच आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नृत्यांगन व संस्कार भारती पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर कापोते यांच्या हस्ते झाले. अन्ताया प्रदर्शनाचा मुख्य विषय स्वरभारती होता. ज्यामधून भारताच्या समृद्ध स्थानिक वाद्य परंपरेचा उत्सवी भावाने गौरव करण्यात आला. बालवाटिका पहिली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी ५ फूट ते १२० फूट उंचीच्या भव्य, आकर्षक आणि अचूक प्रतिकृती स्क्रॅप व पर्यावरणपूरक साहित्य वापरून साकारल्या. प्रत्येक प्रतिकृतीत विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील सखोलता, सर्जनशीलता आणि कौशल्याचे दर्शन घडले.
यासोबतच आयोजित करण्यात आलेले ‘स्व’- उद्योजकता शिखर संमेलनात विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, नवोपक्रम आणि व्यवसायिक दृष्टीकोन विकसित करणारे ठरले. शाळेकडून पुरविण्यात आलेल्या बीज-भांडवलाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी स्वतःची उत्पादने संकल्पित करणे, डिझाइन करणे, निर्मिती, पॅकेजिंग, ब्रँडिंग, विपणन आणि विक्री या संपूर्ण प्रक्रियेचा अनुभव घेतला. कर्मचारी वृत्तीपासून उद्योजक वृत्तीपर्यंतचा हा परिवर्तनशील प्रवास विद्यार्थ्यांसाठी अत्यंत शिक्षणप्रद आणि प्रेरणादायी ठरला, असे प्रतिपादन ब्रिगेडियर कठोच यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: लाइव्ह शो, स्पोर्ट्स आणि इव्हेंट्सचे नवे ठिकाण... नवी मुंबई देशाचं एंटरटेनमेंट हब बनणार! सिडकोचा भव्य एरिना प्रकल्प काय आहे?

MPSC Exam Postponed : MPSC ची २१ डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नगरपरिषद निवडणुकांच्या निकालांमुळे निर्णय

मुलं न होऊ देण्याचा निर्णय चुकला नाही... लोकप्रिय अभिनेत्रीचं स्पष्ट मत; यावर पर्ण पेठे म्हणाली- माझ्या वयात...

Latest Marathi News Update : MPSC परीक्षा पुढे ढकलली

ZP Exam Controversy : उच्च जातीचे नाव काय? जिल्हा परिषदेच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत संतापजनक प्रश्न...

SCROLL FOR NEXT