पिंपरी-चिंचवड

प्रत्येक गावात गाथा-ज्ञानेश्वरी वने व्हायला हवीत

CD

सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांचे आवाहन;
देहू, ता. ३० : ‘‘प्रत्येक गावात तुकोबा, ज्ञानोबा आणायचे तर गाथा वन, ज्ञानेश्वरी वन प्रत्येक गावात व्हावे,’’ असे आवाहन सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी देहू येथे सोमवारी केले.
देहू नगरपंचायत आणि वृक्षदाई प्रतिष्ठान वतीने तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ‘वृक्षारोपण करू, निसर्गाशी नाते जोडू,’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. आमदार सुनील शेळके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष योगी निरंजननाथ, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पोपटराव पवार, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, वृक्षदाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे, बाळासाहेब काशीद व इतर व्यासपीठावर उपस्थित होते. देहू नगरपंचायत व वृक्षदा प्रतिष्ठानच्या वतीने नाम फाउंडेशनला जगद्‍गुरू श्री संत तुकाराम महाराज वृक्षवल्ली सेवा पुरस्कार देण्यात आला फाउंडेशनच्या वतीने मकरंद अनासपुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला
अनासपुरे म्हणाले, ‘‘प्रत्येक व्यक्तीने पुढच्या पिढीचा विचार करावा. विद्यार्थ्यांना एक एक वृक्ष लावण्यास सांगावे. सयाजी शिंदेचे वृक्षावर प्रेम आहे. त्यामुळे जे विदेशी वृक्ष आहेत, ते काढा व त्याच्या बदल्यात आपली झाडे लावा. सध्या बिबटे मानवी वस्तीत येतात, कारण त्यांचे खाणे बंद झालेले आहे. त्यामुळे वृक्ष लागवड केली पाहिजे.’’
आमदार शेळके म्हणाले, ‘‘रोजगार हमी योजनेतून वृक्षारोपण करण्यास प्राधान्य देण्यात येईल. पोपटराव पवार आणि श्री निरंजननाथ यांनीही मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

Kolhapur Auto Rickshaw Drivers Protest : 42 रुपयांचा एलपीजी गॅस 80 रुपये कसा झाला? दरवाढीवरून रिक्षाचालकांचा एलपीजी गॅस पंपाला घेराव

SCROLL FOR NEXT