पिंपरी-चिंचवड

सण-उत्सवात डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा

CD

देहू, ता.१२ ः ‘डीजे’चा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. डीजे वर होणारा खर्च वाचवून प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्था राखत सण, उत्सव साजरा करा, असे आवाहन पोलिस उपायुक्त बाळासाहेब कोपनर यांनी केले.
महाशिवरात्री, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि रमजान मासारंभ निमित्त देहूरोड पोलिस ठाण्यात शांतता समिती, महिला दक्षता समिती, ज्येष्ठ नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी यांची बैठक झाली. या वेळी ते बोलत होते.
विविध जाती धर्मातील नागरिक देहू, देहूरोड परिसरात राहतात. काही गुन्हेगार वृत्तीचे लोक सण-उत्सवातील एकतेला गालबोट लावण्याच्या प्रयत्न करत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे तरुण भरधाव वेगाने ट्रिपल सीट, कर्कश व फटाक्यांचा आवाज काढत बुलेट व दुचाकी चालवतात. या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येणार आहे.
नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, शिवसेनेचे प्रमुख दीपक चौगुले, भाजपची माजी शहराध्यक्ष लहू शेलार, गफूर शेख, सुनीता चांदणे, ज्येष्ठ नागरिक नानासाहेब डोईफोडे आदींनी मनोगत व्यक्त केले. पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे, समिती सदस्य या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

Junnar Khirehwar News: जुन्नरच्या खिरेश्वरमध्ये माती माफियांवर महसूल विभागाची धडक कारवाई; अवैध माती वाहतूक करणारे वाहन जप्त

Amravati Crime : दोन पीडितांवर अमरावतीमध्ये अत्याचार; आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटीचे गठण

SCROLL FOR NEXT