पिंपरी-चिंचवड

बीज सोहळ्यासाठी देहूत वैष्णवांची मांदियाळी

CD

तयारी बीज सोहळ्याची...

देहू, ता. ३ : संत तुकाराम महाराज बीज सोहळा गुरुवारी (ता. ५) होत असून, त्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून भाविक देहूत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायतीने विविध सोयी सुविधा पुरविल्या आहेत. येथे आलेल्या विविध दिंड्यांतील भाविकांमुळे इंद्रायणी नदीचा काठ फुलून गेला आहे.

या सोहळ्याबाबत संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे आणि दिलीप महाराज मोरे म्हणाले, ‘‘संस्थानच्या वतीने मुख्य देऊळवाडा आणि वैकुंठगमन स्थान येथील मंदिरांची विद्युत रोषणाई व रंगरंगोटी करण्यात आली आहे. मंदिरालगतचा परिसर अतिरिक्त कर्मचारी नेमून स्वच्छ करण्यात आला आहे. मुख्य देऊळवाड्यात ३२ सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, वैकुंठगमन स्थान मंदिर परिसरातही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बीज सोहळ्याच्या कार्यक्रमांना गुरुवारी (ता.५) पहाटेपासून सुरुवात होणार आहे.’’

अशी आहे तयारी
- देहू नगरपंचायतीच्या वतीने गाव तसेच इंद्रायणी नदी घाट परिसराची स्वच्छता
- माळवाडी, देहू, विठ्ठलवाडी आणि गाथा मंदिर परिसरात औषधफवारणी
- भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी २४ तास पाणीपुरवठा तसेच टँकरची व्यवस्था
- देऊळवाडा आणि वैकुंठगमन स्थान परिसरात चोख पोलिस बंदोबस्त
- पीएमपी बससाठी गावाबाहेर वाहनतळ
- महावितरणकडून २४ तास अखंड वीजपुरवठा सुरू ठेवणार
- कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष पथक तैनात
- प्राथमिक आरोग्य केंद्रात चोवीस तास वैद्यकीय सेवा उपलब्ध

बीज सोहळ्यादिवशी कार्यक्रम
- पहाटे ३ वाजता : मुख्य देऊळवाड्यात काकडारती
- पहाटे ४ वाजता : श्री पूजा व संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा, संस्थान अध्यक्ष, विश्वस्त, वंशज व वारकरी यांच्या हस्ते
- पहाटे ४.३० ः विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा
- पहाटे ६.०० : वैकुंठगमन स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा
- सकाळी १० ः वैकुंठगमन स्थान मंदिराकडे पालखीचे मार्गस्थ
- सकाळी १० ते दुपारी १२ ः वैकुंठगमन सोहळ्यावर देहूकर महाराज यांच्यावतीने कीर्तन
- दुपारी १२.३० ः वैकुंठगमन स्थान येथून पालखीचे मुख्य देऊळवाड्यात आगमन
- रात्री ः पारंपरिक फड व दिंड्यांकडून कीर्तन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT