देहू, ता. ३ : पिंपरी चिंचवड अपर तहसीलदार कार्यालयाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान सात मार्च ते १५ मेदरम्यान विविध ठिकाणी राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अपर तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिली.
या अभियानात नागरिकांना विविध दाखले वाटप करण्यात येणार आहेत. तसेच सात-बारा उताऱ्यावरील प्रलंबित फेरफार निकाली काढणे, सात-बारा उताऱ्यावरील चुकांसंदर्भात अर्ज स्वीकारणे, डिजिटल सात-बारा व फेरफार वाटप करणे, शेतकरी ओळखपत्र मिळाले नसेल तर त्याची नोंद करणे, सुधारित तुकडे बंद दस्ताची तरतुदीनुसार नोंद करणे, नवीन अकृषक सुधारण्याची जनजागृती करणे, जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राचे अर्ज स्वीकारणे व इतर कामे केली जाणार आहेत.
अभियानाचे ठिकाण आणि दिवस
कोकण मराठा संघ सभागृह, दिघी - ७ मार्च
खंडोबा मंदिर, आकुर्डी - १४ मार्च
विमल गार्डन कार्यालय रहाटणी - १४ एप्रिल
चंद्रभागा लॉन्स, राजे शिवाजीनगर -१४ एप्रिल
देहू नगरपंचायत कार्यालय - ८ मे
श्री नागेश्वर मंदिर - १५ मे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.